Next
‘शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करणार’
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, June 18, 2019 | 04:38 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘वीज बचतीसाठी सौर ऊर्जा महत्त्वाचा पर्याय असून, भविष्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्यात येईल,’ असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे सांगितले.

हॉटेल ट्रायडंट येथे ‘स्कोपिंग मिशन फॉर सोलार रुफटॉप’ कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडचे (ईईएसएल) अध्यक्ष राजीव शर्मा, व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले, ‘सौर ऊर्जेचा वापर ही काळाची गरज असून, त्यामुळे पाणी आणि कोळशाची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. त्याचबरोबर पर्यावरणपूरक वीज उपलब्धतेमुळे कार्बन उत्सर्जनात मोठ्या प्रमाणात घट होऊन करोडो रुपयांची आर्थिक बचत होऊ शकते. राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांनी पथदिव्यांसाठी सौरऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. औद्योगिक क्षेत्रांतही मोठ्या प्रमाणात अशी ऊर्जा निर्माण केली, तर पर्यावरणाची हानी होणार नाही. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.’

‘पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टप्प्या-टप्प्याने कमी करावा लागणार असून, त्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक व्हेइकल वापरण्याबाबत जनजागृती करावी लागणार आहे. राज्य शासनाने पाच इलेक्ट्रिक वाहने प्रायोगिक तत्त्वावर घेतली असून, लवकरच शासकीय कार्यालयांसाठी इलेक्ट्रिक वाहनांवर भर देण्यात येणार आहे. वाहनांच्या चार्जिंगसाठी रस्त्यावर जागोजागी चार्जिंग पॉइंट उभारण्यात येतील, त्याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांनाही होईल,’ असे पाटील यांनी सांगितले.

‘राज्य शासनाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सौरपंप दिले असून, त्यामुळे विजेची बचत झालेली आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ शासकीय कार्यालयांनी न करता सर्वसामान्य नागरिकांनीही केल्यास आर्थिक बचतीबरोबरच पर्यावरणाचे रक्षण होईल. जवळपास पाच हजार सार्वजनिक इमारतींवर सौर पॅनल बसविलेले असून, सरकारकडून त्याची चाचपणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील सरकारी इमारतींनी ३९ टक्क्यांपर्यंत ऊर्जा बचत केली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘ईईएसएल’तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात २०१७पासून बिल्डिंग एनर्जी एफिशिअन्सी प्रोग्राम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात विजेचा किफायतशीर वापर करणारे सात हजार एसी, ११ लाख एलईडी बल्ब, सहा लाख पंखे आणि १४ हजार पथदिवे बदलणार असून, त्यामुळे १० कोटी युनिट विजेची बचत होणार आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search