Next
सात वर्षे ‘हेपटायटिस सी’शी लढणाऱ्या महिलेचा लढा यशस्वी
प्रेस रिलीज
Saturday, April 20, 2019 | 11:38 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारत सरकारने सोफोसबुवीर, डॅक्लातास्व्हिर आणि रिबॅव्हायरिनसारखी औषधे गरजूंना राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून दिली आहेत. याचा फायदा गेली सात वर्षे ‘हेपटायटिस सी’शी (एचसीव्ही) लढणाऱ्या ५९ वर्षीय महिलेला झाला आहे. 

२०१३ सालापासून एचसीव्ही पॉझिटिव्ह असलेल्या महिलेवर एक वर्ष इंजेक्शनद्वारे उपचार करण्यात आले आणि या काळात त्यांनी या उपचारांना काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी उपलब्ध असलेली तोंडावाटे घेण्याची औषधे (सोफोस्बुव्हिर + डॅक्लातस्व्हिर) त्यांना देण्यात आली. तोंडावाटे देण्याच्या औषधांपूर्वी उपलब्ध व सर्वज्ञात असलेले उपचार म्हणजे इंटरफेरॉन आणि रिबॅव्हायरिन. रुग्णाला कोणतीही मात्रा लागू पडत नव्हती. त्यानंतर त्या मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आल्या आणि तेथे त्यांना तोंडावाटे घेण्याची नवीन औषधे देण्यात आली.

ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांना त्यावेळी उपलब्ध असलेली एचसीव्हीसाठी तोंडावाटे दिली जाणारी औषधे सोफोस्बुव्हिर आणि व्हेल्पाटस्व्हिर व आणखी एक औषध रिबॅव्हायरिन असे उपचार सहा महिने देण्यात आले. रुग्णाने या उपचारांना प्रतिसाद दिला आणि त्यांच्या शरीरातील विषाणू नष्ट झाले. हा विषाणू या टप्प्यावर नष्ट झाला नसला, तर रुग्णाला यकृताचे विकार, अगदी यकृताचा कॅन्सरही होण्याचा धोका होता.  

मुंबईतील परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमधील हेपॅटोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. समीर शहा म्हणाले, ‘रुग्णावर बराच काळ वेगवेगळ्या औषधांच्या प्रणालींसह उपचार करण्यात आले; मात्र ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना ‘एचसीव्ही’ हाताळण्यात मदत केली. औषधांचा एक योग्य समूह निवडून आणि त्यात रिबॅव्हिरिन या एका नव्या औषधाची भर घालून हे शक्य झाले. आता रुग्णाची प्रकृती उत्तम आहे.’

मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये १९३ रुग्णांवर तोंडावाटे घेण्याच्या नवीन औषधांसह उपचार करण्यात आले आहेत आणि त्यातील ९८ टक्के रुग्णांनी या औषधांना चांगला प्रतिसाद दिला आहे. भारतातील आठ केंद्रांतील ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूची (एचसीव्ही) लागण झालेल्या ९४६ रुग्णांची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. ही माहिती ‘फाइंडिंग्ज फ्रॉम अ लार्ज एशिअन क्रॉनिक हेपॅटायटिस सी रिअल-लाइफ स्टडी’ या नावाने प्रसिद्ध झाली आहे. भारतातील ९५ टक्के रुग्णांमधील हा विषाणू नष्ट करणे शक्य असल्याचे या माहितीवरून दिसून येते, असे ग्लोबल हॉस्पिटलमधील वरिष्ठ क्लिनिकल संशोधन समन्वयक डॉ. मृणाल कामत यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search