Next
समतानगर जिल्हा परिषद शाळेत जिजाऊ जयंती साजरी
BOI
Monday, January 14 | 01:25 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना महामानवांचा इतिहास माहिती व्हावा व त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा या हेतूने भिवंडी तालुक्यातील बोरीवली-समतानगर जिल्हा परिषद मराठी शाळेत राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव व सहशिक्षिका स्वाती गिरी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्यावर प्रकाश टाकून जिजाऊंचा आदर्श विद्यार्थ्यांनी नेहमीच डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन केले.



कवी मिलिंद जाधव व कवी चेतन जाधव यांनी जिजाऊंच्या जीवनावर कविता सादर केली. या वेळी मुख्याध्यापक सुरेखा जाधव, सहशिक्षिका स्वाती गिरी, कवी मिलिंद जाधव, कवी चेतन जाधव, अंगणवाडी मदतनीस सीमा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link