Next
रमाबाई रानडे यांचे चरित्र
BOI
Friday, June 22 | 10:12 AM
15 0 0
Share this story

न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या विद्वान, समाजसुधारक पतीच्या सहवासात राहून स्त्री उद्धारासाठी कार्य करणाऱ्या, शिक्षणाची कवाडे स्त्रियांना खुली करण्यासाठी ‘सेवासदन’ची स्थापना करणाऱ्या रमाबाई रानडे यांचे रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. रमाबाईंचे कार्य यातून समजते, तसेच कठीण स्थितीशी त्यांनी केलेला सामनही समजतो. तत्कालीन सामाजिक स्थितीही त्यातून प्रत्ययाला येते. पुस्तकात प्रारंभी न्यायमूर्ती महादेव रानडे यांची पार्श्वभूमी सांगितली आहे.

त्यांचे काम, मुंबई पुणे, कोल्हापूरमधील झाल्यावर त्यांचा रमाबाईंशी विवाह झाला. रमाबाईंचे शिक्षण सुरू झाले. त्यासाठी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला. शिक्षणातील त्यांची प्रगती थक्क करणारी होती. नंतर त्यांनी अध्यापनास सुरुवात केली. पतीनिधनानंतरही संकटांशी सामना करत त्यांनी सामाजिक कार्य सुरूच ठेवले आदी सर्व माहिती या चरित्रातून मिळते.

प्रकाशक : वरदा प्रकाशन
पाने : १६०
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link