Next
पाकिस्तानची वाटचाल विनाशाकडून विनाशाकडे
डॉ. परीक्षित शेवडे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, June 24, 2019 | 05:43 PM
15 0 0
Share this article:

डॉ. परीक्षित शेवडे

रत्नागिरी :
‘इंग्रजांनी हिंदू-मुस्लिमांना जाणीवपूर्वक विभागले. फाळणी १९४७मध्ये झाली असली, तरी इंग्रजांनी त्याची सुरुवात १९०५मध्ये बंगालच्या फाळणीपासून केली होती. हिंदुस्थानचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा कायम पराभवच झाला असून, आता पाकिस्तानचेच तुकडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानची विनाशाकडून विनाशाकडे वाटचाल सुरू आहे,’ असे प्रतिपादन लेखक डॉ. परीक्षित शेवडे यांनी केले.

पुस्तक प्रकाशन करताना डॉ. सुभाष देव, डॉ. परीक्षित शेवडे, माधव हिर्लेकर व मान्यवर

डॉ. सच्चिदानंद शेवडे व त्यांचे सुपुत्र डॉ. परीक्षित शेवडे यांनी लिहिलेल्या ‘पाकिस्तान - विनाशाकडून विनाशाकडे’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच रत्नागिरीत कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

‘जमात ए पुरोगामी’ या पुस्तकाची एका आठवड्यात पहिली आवृत्ती संपली, ‘राम मंदिरच का?’ या पुस्तकाची आवृत्ती तीन दिवसांत संपली व ‘पाकिस्तान – विनाशाकडून विनाशाकडे’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती महिनाभरात संपली. लोकांना चांगले वाचायला हवे असते, याचेच हे उदाहरण आहे,’ असे शेवडे यांनी सांगितले. या वेळी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी त्यांचा सत्कार केला.‘भारतालाच पाकिस्तान बनवून टाकायचे ही मानसिकता आहे. ‘पाकिस्तान हा मोठा देश होता; पण हिंदूंनी हिंदुस्थान बाजूला काढला. स्वातंत्र्यानंतर आपल्याला सत्ता हवी होती; पण ते मिळाले नाही, त्यामुळे स्वतंत्र पाकिस्तान निर्माण केला,’ असे पाकिस्तानात शालेय पुस्तकांमध्ये, मदरशांमध्ये शिकवले जाते. सध्या तिथे ३५ हजार मदरसे आहेत. ‘इस्लाम सर्वश्रेष्ठ आहे, त्यापुढे कोणी नाही व संधी मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी जिहाद करावा,’ असे तिथे शिकवले जाते. थेट लढाईत पराभव होत असल्याने अशा आतंकवाद्यांना पाठवून भारतात छुपे हल्ले केले जात आहेत,’ असे डॉ. शेवडे म्हणाले.

‘भारतावर इंग्रज, मुघल, छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य होते, हे सांगितले जाते; पण कदंब, यादव, मौर्य घराण्याचा इतिहास सांगितला जात नाही. संभाजीराजांविषयी फार सांगितले जात नाही. गौरवशाली इतिहास एका धड्यात संपवला जातो. यामुळे गुलामगिरीची मानसिकता झाली आहे. ती बदलण्याची गरज आहे,’ असेही डॉ. शेवडे म्हणाले.

‘काश्मीरमध्ये ‘नॅक’साठी कॉलेजच्या पाहणीवेळी गेलो, तेव्हा दोन्ही हातांना जवान उभे होते. आपले राज्य पाकिस्तान सीमेवर नसल्याने आपल्याला तिथले दुःख, गोळीबार, बाँबहल्ल्यांचा वर्षाव या गोष्टी समजू शकत नाहीत. आपण उगाचच रस्त्यावरील खड्डे आणि इथल्या समस्यांवर बोलत राहतो. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या सीमारेषेवर जवान कसे राहतात, याचा विचारच करत नाही. भारतीय म्हणून आपण याचा विचार केला पाहिजे. पाकिस्तानची नांगी भारताने ठेचली आहे. २०१४पूर्वी हल्ला झाला, की ‘भ्याड हल्ल्याचा निषेध’ असे सरकारकडून बोलले जायचे; पण सरकार बदलून कणखर नेतृत्व आल्याने सर्जिकल स्ट्राइक झाला. तसेच जवान अभिनंदनला पाकिस्तानने भारताकडे विनाशर्त सुपुर्द केले. हा एक मोठा विजय आहे,’ असे डॉ. सुभाष देव म्हणाले.

(‘पाकिस्तान - विनाशाकडून विनाशाकडे’ हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 110 Days ago
Nobody wants the disintegration of Pakistan . America , China , UK , India , Russia --- they all want her to servive . In what form ? That is a different question .
0
0

Select Language
Share Link
 
Search