Next
‘डीकेटीई’मध्ये विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 03:35 PM
15 0 0
Share this story

‘डीकेटीई’तर्फे आयोजित इंजिनीअरिंग प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले.इचलकरंजी : ‘एकविसाव्या शतकात झपाटयाने होत असलेल्या तंत्रज्ञानातील बदलांचा आव्हान पेलणारा अभियंता घडवण्याची क्षमता ‘डीकटीई’मध्येच आहे,’ असे प्रतिपादन ‘डीकेटीई’चे डायरेक्टर डॉ पी. व्ही. कडोले यांनी केले. टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभात नुकताच झाला. त्या वेळी ते बोलत होते.  

येथील घोरपडे नाट्यगृहात झालेल्या समारंभात बोलताना ते म्हणाले, ‘डीकेटीईचे जगभर पसरलेले विद्यार्थी ‘डीकेटीई’चे नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे इंजिनीअरिंग क्षेत्रात ‘डीकेटीई’ हा ब्रँड झाला आहे. हा ब्रँड अबाधित राखायची जबाबदारी ही नव्या विद्यार्थ्यांची आहे.  त्यासाठी संस्था आणि प्राध्यापक सर्वतोपरी प्रयत्न करतील त्याला आपला सर्वांचा सहयोग मिळाला पाहीजे.’

‘विद्यार्थ्यांनी प्राध्यपकांशी समन्वय साधत आपले अभ्यासक्रमातील आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून अभियांत्रिकी शिक्षणातील यश संपन्न करावे व विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाने ‘डीकेटीई’चा असाच नावलौकीक वाढवावा,’ असे सांगून डॉ. कडोले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला उपस्थित विद्याथी आणि पालकस्वागत करताना डे.डायरेक्टर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) प्रा. डॉ. यु. जे. पाटील म्हणाले, ‘जगभरातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांना वाय-फाय सुविधा, अत्याधुनिक लायब्ररी अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्लेसमेंट देण्यामध्ये ‘डीकेटीई’ देशात आघाडीवर आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’

डे.डायरेक्टर (अ‍ॅकॅडमिक्स) प्रा. डॉ. अडमुठे यांनी प्रास्ताविकात विविध देशातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थातील सामंजस्य करारामुळे पदव्युत्तर शिक्षण मोठया शिष्यवृत्तीसह घेण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळत असल्याने यावरून संस्थेतील गुणवत्तापूर्ण शिक्षण अधोरेखित होत असल्याचे नमूद केले.

प्रथम वर्षाचे प्रमुख प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. एस. जी. कानिटकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, सर्व डीन्स, टेक्स्टाइल व इंजिनीअरिंग विभागाचे प्लेसमेंट ऑफिसर, हॉस्टेल विभागप्रमुख यांसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थिती होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. ए. के. घाटगे यांनी केले. या कार्यक्रमास प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजमधील सर्व विभागाची ओळख करून देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link