Next
‘सायकल शेअरिंग’चा पुण्यात शुभारंभ
प्रेस रिलीज
Tuesday, March 27 | 04:33 PM
15 0 0
Share this story

मुंबई : भारतातील पहिली डॉकलेस सायकल शेअरिंग सुविधा मोबीसीने पुण्यात आपल्या कार्याचा शुभारंभ केला आहे. पुणे शहरातील विमान नगर, खराडी, चंदन नगर अशा महत्त्वाच्या ठिकाणी २०० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या बाईक्स ईओएन आणि डब्ल्यूटीसी आयटी पार्क, विमान नगरमधील सिम्बॉयसिस कँपस, विमानतळ क्षेत्र आदी वर्दळीच्या ठिकाणी भाड्याने उपलब्ध होतील. या सुविधेचा फायदा जवळचे अंतर गाठण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांसोबत, कार्यालयात जाणाऱ्या पुणेकरांना घेता येईल.

मोबीसीचे सह-संस्थापक आकाश गुप्ता यांनी सांगितले की, ‘पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर आहे. माझा सुरुवातीपासूनच पुणे शहरात ही सेवा सुरू करण्याचा मानस होता. कारण येथे विद्यार्थ्यांची आणि तरुण वर्गाची संख्या अधिक आहे. ज्यांना या सेवेचा सर्वाधिक फायदा होऊ शकेल. आम्ही शहरातील विविध ठिकाणी या सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्याचे बुकिंग अॅपच्या माध्यमातून करता येईल. पुण्यातील प्रवेशद्वारे सायकली सहजसाध्य आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देऊन कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी रोजच्या प्रवाशांमध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश आहे.’

भारताला अधिक हरित, अधिक तंदुरूस्त सायकलिंग राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आणि मोहीम हाती घेऊन या स्टार्टअपची सुरुवात करण्यात आली आहे. मोबीसीच्या स्मार्ट बाइक्सच्या कलेक्शनमध्ये आयओटी लॉक्स आणि जीपीएस ट्रॅकिंग यांचा समावेश आहे आणि त्यामुळे त्याचा वापर पार्किंगसाठी डॉक किंवा स्टेशनशिवाय केला जाऊ शकतो. वापरकर्ते मोबीसी अॅप डाऊनलोड करून आसपासच्या परिसरात बाइक्स शोधू शकतात. क्यूआर कोडचा वापर करून त्या अनलॉक करू शकतात आणि आसपासच्या परिसरात त्या सुरक्षितपणे पार्क करू शकतात. वापरकर्त्यांना ३-६ किलोमीटरवरील ठिकाणापर्यंतचे अंतर कधीही, कुठेही उपलब्ध सायकलवर पार करता यावे, हे या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. मोबीसी सध्या प्रति राइडसाठी दर तासाला १० रुपये आकारात आहे. मासिक योजनेअंतर्गत ९९ रुपये शुल्क भरून वापरकर्त्यांना रोज दोन तास या सेवेचा लाभ घेता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link