Next
‘वाघी गावाला निधी कमी पडू देणार नाही’
आमदार नागेश पाटील यांचे आश्वासन
नागेश शिंदे
Monday, January 14 | 03:48 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर : ‘मी वाघी गावाच्या विकासासाठी कुठल्याच प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही,’ असे आश्वासन हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले.

तालुक्यातील मौजे वाघी येथे आमदार पाटील आष्टीकर यांच्या हस्ते जलशुद्धीकरण यंत्रासह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम १३ जानेवारी २०१९ रोजी झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाघी गावच्या सरपंच जोत्स्ना माने यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर, हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विशाल परभणकर, नगरसेवक विनायक मेंडके, सावन डाके, हिमायतनगर शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, बबनराव जाधव, अमोल पाटील, कृष्णा पाटील दिघीकर, दिघी गावचे उपसरपंच सुनील वानखेडे उपस्थित होते.

वाघी येथील जलशुद्धीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार पाटील यांनी वाघी गावातील सुविधांच्या अभावांची तत्काळ दाखल घेतली आणि वाघी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी वाघी येथील मातंग वस्तीत एलईडी बल्प बसवणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभित करणे, दलित वस्तीत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळेची भिंत व गेट बांधणे, अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करणे, किरमगावला जाणार सीसी रस्ता पक्का बांधणे व अंगणवाडी दुरुस्तीसह स्वच्छता संकुल बांधकामासह आदी विकासकामांचे उद्घाटन केले.



या वेळी श्रीराम माने, नीळकंठराव माने, रामदास माने, अजय देवसरकर, बालाजी देवसरकर, विजय माने, प्रकाश सालेगावकर, दिगंबर पाटील, माधवराव गुरुजी, राजू बदनवाड, गजानन माने, शे.सलीम, सीताराम माने, शुभम कोसल्या, परमेश्वर माने, विकास माने, ग्यानबा कांबळे, प्रकाश गायकवाड यांसह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link