Next
पॉटरी कलाकृतींची पुणेकरांना भुरळ
BOI
Saturday, September 07, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : देशभरातील ‘पॉटरी’ कलाकारांनी सिरॅमिक, टेराकोटा माध्यमात साकारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृती बघण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ या खास ‘पॉटरी’महोत्सवाला फिनिक्स मार्केट सिटी येथे सुरुवात झाली असून, या महोत्सवात मुंबई, भावनगर, विजयवाडा, पुणे, हैद्राबाद, कानपूर, अहमदाबाद, अहमदनगर, कोलकाता आदी ठिकाणांहून आलेले १६ कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांनी घडवलेल्या आकर्षक भेटवस्तू, मातीची भांडी, मातीपासून बनविलेले दागिने, नक्षीदार फुलदाण्या, पणत्यांचे स्टँड, मातीची घड्याळे अशा एक ना अनेक दुर्मिळ कलाकृती पहायला मिळत आहेत. 


‘आयजीए’चे संस्थापक इंद्रनील गराई यांच्या संकल्पनेतून साकार झालेला व ‘आयजीए गॅलेरीया’द्वारा आयोजित हा महोत्सव रविवार, दि. आठ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत फिनिक्स मार्केट सिटी येथे खुला राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर ते रविवार, १५ सप्टेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथेदेखील या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात देशातील आणखी १६ कलाकार सहभागी होणार आहेत.

इंद्रनील गराई
‘भारतातील सर्वात पहिल्या महिला ‘पॉटरी’ कलाकार निर्मला पटवर्धन या पुण्यातील होत्या. त्यांच्याकडे देशभरातून कलाकार ही कला शिकण्यासाठी येत असत, मात्र असे असूनही आजही पुण्यात आणि एकूणच देशात या कलेविषयीची जागरूकता नाही,’ अशी खंत व्यक्त आयोजक गराई यांनी व्यक्त केली. 

 ‘जेथे नदी असते जवळपास त्या प्रत्येक ठिकाणी पूर्वापार कुंभारकाम चालत आलेले असते; परंतु त्यात अनेक प्रयोग करून, संशोधन करून ही वैशिष्ट्यपूर्ण ‘पॉटरी’ कला विकसित झाली आहे. जसे एखाद्या चित्रकाराचे चित्र हे एकमेवाद्वितीय असते. त्याच्या अनेक प्रती निघू शकत नाहीत; तसेच या कलेतील कलाकृतींचे असते. याविषयी लोकांमध्ये फारशी जागरूकता नाही. त्यामुळेच या कलेला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही. या कलेचे वेगळेपण पुणेकरांसमोर आणण्यासाठी पुण्यात एवढ्या मोठ्याप्रमाणात आम्ही हा महोत्सव भरविला आहे,’ असेही गराई यांनी स्पष्ट केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search