Next
विखे पाटील मेमोरियल शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के
आयुषी बर्वे ९८.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम
BOI
Tuesday, May 07, 2019 | 04:25 PM
15 0 0
Share this article:

आयुषी बर्वेपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत यंदाही डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या विखे पाटील मेमोरियल शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. शाळेतील एकूण १४६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी ७१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ४७ विद्यार्थ्यांनी ८० ते ९० टक्के,१८ विद्यार्थ्यांनी ७० ते ८० टक्के, ७ विद्यार्थ्यांनी ६० ते ७० टक्के तर तीन विद्यार्थ्यांनी ५०-६० टक्क्यांमध्ये गुण मिळवले आहेत. 

आयुषी बर्वे हिने ९८.२ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक मिळवला असून, तिने विज्ञान आणि समाजशास्त्र या दोन्ही विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत. शार्दुल शिंगारे ९७.६, सिद्ध आठणे ९७.२, राधेय कानडे ९६.६, अन्यना अलूरकर  ९६.४ टक्के गुण मिळवून पहिल्या पाच क्रमांकातील मानकरी ठरले.  गणितात शार्दुल शिंगारे, अन्यना अलूरकर आणि अपूर्वा सिंग यांनी शंभर गुण मिळवले आहेत. 

विखे पाटील मेमोरियल शाळेचे यशस्वी विद्यार्थी

जागृती जैन आणि इशा आठवले यांनी मराठी विषयात ९७ गुण मिळवले असून, अद्विका पांडे हिने इंग्लिशमध्ये ९६ गुण मिळवले आहेत. फ्रेंच भाषेत आस्था भोसले हिने शंभरपैकी ९९ गुण मिळवले आहेत.  शाळेतील क्रीडा स्पर्धा, विविध उपक्रम यात सक्रीय सहभाग घेऊन सर्व मुलांनी उत्तम यश मिळवले आहे.  

(ही बातमी इंग्रजीतून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search