Next
भिवंडीत भारिप बहुजन महासंघ सभा
मिलिंद जाधव
Tuesday, November 20, 2018 | 10:44 AM
15 0 0
Share this article:



भिवंडी :
भारिप बहुजन महासंघाच्या भिवंडी तालुका (ग्रामीण) शाखेतर्फे प्रबुद्ध भारत वाचक, वितरण मेळावा, सम्यक विद्यार्थी मेळावा, सभासद नोंदणी अभियान व कार्यकर्ता मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. 



भिवंडी शहरातील कामतघर वऱ्हाळदेवी, मंगल भवन कार्यालय येथे हे कार्यक्रम नुकतेच पार पडले. या वेळी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यध्यक्ष अॅड. भीमराव आंबेडकर, पालघर व ठाणे जिल्हा सम्यक विद्यार्थी आंदोलन संपर्क प्रमुख डॉ. वाय. के. ठोंबरे, अॅड. प्रकाश मौर्या, स्वागताध्यक्ष ए. वाय.जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. धामणकर नाका येथून ढोल-ताशांच्या गजरात भीमराव आंबेडकरांची या वेळी रथामधून मिरवणूक काढण्यात आली. 



‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत वर्तमानपत्र हे आपल्याला पुढे सुरू ठेवायचे असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन ते काम केले पाहिजे. देशभरात फिरणारा एकच नेता तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. महाराष्ट्रात प्रबुद्ध भारत वर्तमानपत्राचा ३३ हजार खप आहे. महाराष्ट्रात भारिप बहुजन महासंघ विजयी होणार. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक विचार करा. फुले, शाहू, आंबेडकरांना मानणारे आहेत ते सगळे एकत्र येण्याची सुरुवात आता झाली आहे. विषमतावादी व्यवस्थेचा, उच्चनीचतेचा आम्ही धिक्कार करतो. आम्ही तथागत गौतम बुद्धांच्या समतेच्या मार्गाने चाललो आहोत. येणाऱ्या राजकीय क्रांतीलढ्यासाठी आपण एकजुटीने तयार राहा,’ असे भीमराव आंबेडकर यांनी सागितले. 

‘देशाला सामाजिक क्रांतीची गरज आहे. आम्हाला सम्राट अशोकाचे राज्य पाहिजे,’ असे अॅड. प्रकाश मौर्या यांनी सांगितले. ‘आमचा नेता कसा असावा, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखा असावा. प्रबुद्ध भारत दिशा घडविण्याचे काम करणार आहे,’ असे सांगून डॉ. वाय. के. ठोंबरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 



या वेळी कार्यक्रमाला भारिपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, वाचक, लेखक, हितचिंतक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसेच सामाजिक कार्यकर्ते, महिलावर्ग, ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य व प्रकाशन समितीचे माजी सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशिकांत जाधव यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search