Next
केएएफएफतर्फे एअर प्युरिफायर्सची नवी श्रेणी दाखल
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 02:42 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : केएएफएफ, या स्वयंपाकघर आणि घरगुती उपकरणांमधील प्रमुख ब्रँडतर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय परिस्थितीला साजेशा वैशिष्ट्यांसह एअर प्युरिफायरची नवी श्रेणी सादर करण्यात आली आहे.

हवेतील प्रदुषणामुळे गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे एअर प्युरिफायर ही अत्यावश्यक गोष्ट बनली आहे. हे लक्षात घेऊन ‘केएएफएफ’ने चार हजार ९९० रुपये ते ३२ हजार  ९९० रुपये अशा विस्तारीत श्रेणीत, विविध प्रकारच्या रुमच्या आकारांचे आणि भारतातील हवामानाला साजेसे एअर प्युरीफायर दाखल केले आहेत.

केएएफएफ एअर प्युरिफायर्समध्ये अत्याधुनिक हेपा आणि तीनशे साठ डिग्री एअर प्युरिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात धूळ, परागकण, हवेतील अन्य अपायकारक घटक काढून  टाकण्याची खात्री असते. हे उपकरण ऊर्जा सक्षम असून त्यात आवश्यकतेनुसार स्लीप मोडवर जाण्यासाठी सेन्सर आहे. चाइल्ड लॉकचा पर्यायही यात देण्यात आला आहे. या एअर प्युरिफायर्सची श्रेणी २७०ते ८१० चौरस  फुटांपर्यंत अतिशय योग्य आहे. एअर प्युरिफायर्सच्या श्रेणीतील उत्पादनांचे वजन ४.८ किलो ते १० किलो आहे.

या उत्पादनाबाबत अधिक माहिती देताना केएएफएफ अप्लायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक दीपक आनंद म्हणाले, ‘अलिकडच्या काळात हवेतील प्रदुषणात कमालीची वाढ झाली आहे. यामुळेच लोकांनी, अगदी गाडीत असो की घरी, स्वच्छ हवेत श्वासोच्छ्वास करावा, हे आमचे प्रमुख ध्येय बनले आहे. याकरता आम्ही समाजाच्या विविध गरजांना साजेशा आणि वेगवेगळ्या प्रकारातील केएएफएफ एअर प्युरिफायर्स सादर केले आहेत. सातत्याने नावीन्यपूर्णतेच्या मार्गावरून चालणे आणि आपल्या उत्पादनात सुधारणा करत राहणे यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांचे जीवनमूल्य उंचावत असतो. ज्यांना पाळीव प्राणी आवडतात परंतु त्यांच्या केसांची अॅलर्जी असते, अशांसाठी तर केएएफएफ एअर प्युरिफायर्स अत्यंत उपयुक्त आहेत. हे एअर प्युरिफायर्स ग्राहक नेहमीच ऑफिस, घर किंवा कार अशा बंद वातावरणात स्वच्छ हवेत श्वास घेऊ शकतील, याची खात्री देते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link