Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ घेणार ‘सुलभ’ची मदत
प्रेस रिलीज
Thursday, October 04 | 02:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात फिरायला येणाऱ्या व भेटी देणाऱ्या नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था पाहण्यासाठी सुलभ इंटरनॅशनल या संस्थेची मदत घेतली जाणार आहे. महात्मा गांधी जयंतीपासून ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

‘विद्यापीठाच्या कार्यालयीन वेळेशिवायही नागरिक मोठ्या संख्येने विद्यापीठाच्या आवारात येत असतात. त्यांच्यासाठी म्हणून रसायनशास्त्र विभागाच्या समोरील एटीएम केंद्राजवळ तसेच प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगशेजारी अशा दोन ठिकाणी तीन वर्षांपूर्वी शौचालये उभारण्यात आली आहेत. त्यात अपंग व्यक्तींचीही सोय केलेली आहे; मात्र त्या ठिकाणाहून नळ चोरीला जाणे, शौचालयांची नासधूस होणे असे अनेक प्रकार घडल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आता त्या ठिकाणी व्यक्ती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठीच आता सुलभ इंटरनॅशनलची मदत घेतली जाणार आहे. यासाठी येणारा खर्च विद्यापीठ उचलणार आहे. नागरिकांना ही सुविधा विनामूल्य वापरता येईल,’ अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link