Next
छोट्या व्यवसायांसाठी तत्काळ कर्जाची सुविधा
इन्स्टामोजोतर्फे मोजोकॅपिटल सेवा दाखल
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:03 PM
15 0 0
Share this article:

पुणे : एखाद्या छोट्या व्यापाऱ्याला विक्रीचे पैसे येण्यासाठी दोन तीन दिवसांचा वेळ लागणार आहे आणि नेमकी त्यादरम्यान त्याला खेळत्या भांडवलाची गरज लागली, तर बँकेकडून कर्ज मिळेपर्यंत थांबणे शक्य नसते. अशावेळी मदतीला येते ती इन्स्टामोजोची मोजोकॅपिटल ही अनोखी सुविधा. देशातील सर्वात मोठ्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई)उद्योग क्षेत्राला गरजेच्या वेळी तातडीने अगदी कमीत कमी वेळात खेळत्या भांडवलाची उपलब्धता करून देणारी  अनोखी ऑनलाइन सेवा इन्स्टामोजो कंपनीने सुरू केली आहे.  

‘साधारण चार महिन्यांपूर्वी कंपनीने मोजोकॅपिटल ही सेवा दाखल केली. तिला उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ५०० व्यापारी रोज या सेवेचा लाभ घेत आहेत,’ अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गेहानी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

इन्स्टामोजो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश गेहानी
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, ‘कंपनी म्हणून आमच्या पुढे असलेल्या संधींबद्दल आणि कशाप्रकारे आमचे प्रयत्न भारतीय एमएसएमई क्षेत्रात क्रांती घडवून आणतील. व्यावसायिकांची खेळत्या भांडवलाची अडचण तत्काळ दूर करण्यासाठी तातडीने पैसे उपलब्ध करून देणारी कोणतीही ऑनलाईन सुविधा सध्या उपलब्ध नाही. घरगुती पातळीवर व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना अगदी काही शे रुपयांची गरज भासते. त्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे शक्य नसते. ही गरज ओळखून आम्ही लघु कर्ज (सॅशे कर्ज) सुविधा आणली आहे. सॅशे कर्जाअंतर्गत ‘नेक्स्ट डे पेआउट’ आणि ‘इन्स्टंट पेआउट’ असे पर्याय देण्यात आले आहेत, ज्यामुळे व्यापाऱ्यांना लगेचच किंवा दुसऱ्या दिवशी पैसे मिळतात. मोजोकॅपिटल सुविधेसाठी बँका आणि आर्थिक संस्थांशी भागीदारी केली आहे. अगदी काही शे रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम उपलब्ध केली जाते. यामध्ये एखाद्या व्यावसायिकाला तातडीने रोख रक्कम हवी असेल, तर त्याला आवश्यक माहिती दिल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये पैसे त्याच्या बँक खात्यात जमा होतात. एका दिवसापासून ते चाळीस दिवसांपर्यंत रक्कम वापरण्यास मिळते. यासाठी व्याज आकारले न जाता अल्प शुल्क आकारले जाते. या सेवेचा फायदा छोट्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना होत आहे. अनेक कागदपत्रांची गरज नसल्याने वेळ वाचतो. आतापर्यंत जवळपास ५० कोटींची रक्कम आम्ही वितरीत केली असून, ५०० पेक्षा अधिक व्यावसायिक याचा लाभ घेत आहेत. एका दिवसासाठी खेळत्या भांडवलाची गरज भासणाऱ्या उद्योजकांपासून ते महिनाभरासाठी रक्कम लागणाऱ्या व्यावसायिकांचा यात समावेश आहे. कंपनीने ‘मोजोएक्सप्रेस’ ही आणखी एक अनोखी सेवा दिली आहे. जी एमएसएमईजच्या दैनंदिन लॉजिस्टिक्स आणि वितरण कामांसाठी वापरता येऊ शकते. कंपनीने आपल्या नोंदणीकृत व्यापारी ग्राहकांना विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आघाडीच्या लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादारांशी भागीदारी केली आहे.’

‘आज भारत ६.३ कोटी व्यवसायांसह एमएसएमईजच्या संख्येच्याबाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एमएसएमईज या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्या देशाच्या जीडीपीमध्ये ४५ टक्क्यांपर्यंतचे योगदान देतात;मात्र, इतक्या मोठ्या क्षेत्राला आजही काही मूलभूत आव्हानांचा सामना करावा लागतो. रोखीचा अभाव आणि नुकतीच आलेली डिजिटल लाट ही या क्षेत्रासमोरची मोठी आव्हाने आहेत. इ- कॉमर्स तेजीत असताना छोट्या व्यवसायांना आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवहार्य राहाण्यासाठी डिजिटल रुपांतर करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी इन्स्टामोजोच्या डिजिटल पेमेंट सेवा आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या कर्ज व लॉजिस्टिक्स सेवा उपयुक्त ठरतील. आपल्या देशात केवळ ३२ टक्के उद्योग ऑनलाइन आहेत. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे. इन्स्टामोजो अंतर्गत एमएसएमई क्षेत्रासाठी आवश्यक त्या सर्व डिजिटल सुविधा एका छताखाली देण्याची आमची योजना आहे.’

आकाश गेहानी पुढे म्हणाले, ‘पुणे हे छोट्या आणि मध्यम उद्योगांचे मोठे केंद्र आहे. लाखो छोटे, मोठे व्यवसाय येथे आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. येत्या काही दिवसांत आम्ही संपूर्ण पुण्यात आमचे अस्तित्व विस्तारत शहरभरातील उद्योजकांना सक्षम करणार आहोत. पुण्याच्या एमएसएमईजसाठी इन्स्टामोजो एकाच छताखाली सर्व सेवा देणार असून, त्यात पुण्यातील सुमारे लाखभर व्यवसायांचा समावेश आहे. देशभरातील उदयोन्मुख छोट्या व्यवसायांना सर्वसमावेशक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नजीकच्या भविष्यात एमएसएमई क्षेत्राला स्पर्धात्मक डिजिटल व्यवसाय वातावरणात आघाडीवर ठेवण्यासाठी प्रसारसेवा सुरू करण्याचे कंपनीने ठरवले आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search