Next
महिला दिनी ‘गौरीज’चा वेगळा उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, March 07 | 06:02 PM
15 0 0
Share this story

पुणे : महिलांनी विद्यार्थिनींसाठी चालविलेल्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कँटीन’मध्ये जागतिक महिला दिनी फर्माइशीच्या प्रत्येक डिशबरोबर पेढे आणि अत्तरचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती ‘अँग्लो कँटीन’च्या संचालक गौरी बिडकर यांनी ही माहिती दिली.

गौरी यांच्या ‘गौरीज किचन’ या स्टार्ट अप फर्मने ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कँटीन’ या महिन्यातच चालविण्यास घेतले आहे. अँग्लो उर्दू गर्ल्स गर्ल्स स्कूल आणि आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय परिसरात असलेल्या या कँटीनमध्ये विद्यार्थिनींची कायम गर्दी असते; तसेच कँटीनमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला आहेत. यामध्ये कँटीन संचालक बिडकर यांच्यासह सहाय्यक सुलताना मुलतानी आणि मदतनीस मीरा अडागळे यांचा समावेश आहे.

या नव्याने जडलेल्या स्नेहापोटी बिडकर यांनी आठ मार्च या महिला दिनी कँटीनला फर्माइश सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीचे स्वागत अत्तर लावून आणि पेढा देऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेतून फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या बिडकर भारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल अशी दोन कँटीन चालवित असून, तिसऱ्या कँटीनची तयारी करत आहेत.

समाजातील मान्यवरांना घरी निमंत्रित करून उत्तमोत्तम पदार्थ करून वाढण्याचा साप्ताहिक उपक्रम त्यांनी सलग तीन वर्षे चालवल्यानंतर त्यांना फूड इंडस्ट्रीत उतरण्याचा आग्रह झाला. आपल्याला चवदार पदार्थ आणि आतिथ्यशीलतेचा वारसा आई अपर्णा भावे यांच्याकडून मिलाल्याचे त्या आवर्जून सांगतात. भारती विद्यापीठ येथे भारतभरातील कॉस्मोपॉलिटिन विद्यार्थी-विद्यार्थिनी, तर अँग्लो उर्दू हायस्कूल येथे सर्वधर्मीय विद्यार्थिनींना आवडणारे पदार्थ करून देताना खूप शिकायला मिळाले, असे त्या म्हणाल्या.  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link