Next
‘बजाज अलियांझ लाइफ’तर्फे मोबाइल अॅपद्वारे प्रतिनिधींची नियुक्ती
प्रेस रिलीज
Tuesday, May 21, 2019 | 04:17 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतातील आघाडीची खासगी जीवन विमा कंपनी असलेल्या ‘बजाज अलियांझ लाइफ’ने डिजिटल प्रवासात ‘आय- रिक्रुट’ या विमा प्रतिनिधींची भरती मोबाइल अॅपद्वारे केली आहे. या मोबाइल अॅपमुळे कंपनीच्या विक्री व्यवस्थापकांना प्रतिनिधींची (बजाज अलायन्झ लाइफमध्ये विमा सल्लागार म्हणून ओळखले जाणारे) कागदपत्रांच्या मदतीशिवाय वेगाने, कुठूनही आणि कोणत्याही वेळेस भरती करता येते. या डिजिटल उपक्रमाच्या मदतीने बजाज अलियांझ लाइफ ही विमा सल्लागारांची भरती प्रक्रिया केवळ मोबाइल अॅपद्वारे करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

एप्रिल २०१८मध्ये सादर झालेले ‘आय- रिक्रुट’ हे मोबाइल अॅप विक्री व्यवस्थापकांना विमा सल्लागारांची जलद आणि विनाअडथळा भरती ते ही कागदपत्रांच्या लांब यादीशिवाय करण्यासाठी मदत व्हावी म्हणून खास डिझाइन करण्यात आले आहे. या अॅपद्वारे विक्री व्यवस्थापकांना त्यांच्या विमा सल्लागारांच्या संपूर्ण भरती प्रक्रियेची काळजी घेता येते. प्राथमिक अर्ज भरण्यापासून, नव्या प्रतिनिधींची केवायसी अधिकृतता तपासण्यापर्यंत, मॉक टेस्ट पेपर उपलब्ध,  नियामक प्रशिक्षणापासून नव्या कर्मचाऱ्यांसाठी परीक्षेचे वेळापत्रक ठरवण्यापर्यंत आणि अखेर परवाना देण्यापर्यंतचे सर्व काम ‘आय- रिक्रुट’द्वारे करता येते. या मोबाइल अॅपने गेल्या वर्षभरात बजाज अलियांझला आतापर्यंत १५ हजार ७०० विमा प्रतिनिधींची डिजिटल पद्धतीने निवड करण्यास मदत केली आहे.

या विषयी बोलताना ‘बजाज अलियांझ लाइफ’चे प्रमुख वितरण अधिकारी मनीष संगल म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात ‘आय- रिक्रुट’ अॅपने घडवलेली क्रांती पाहाताना मला आनंद होत आहे आणि आता यामुळे आम्हाला भारतीय जीवन विमा क्षेत्रात आणखी एक मापदंड प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे. हे वापरण्यास सोपे अॅप एजन्सी चॅनेलसाठी डिझाइन करण्यात आले असून, त्यामुळे आमच्या विमा सल्लागारांच्या भरतीची प्रक्रिया जलद, विनाअडथळा आणि कागदपत्रांशिवाय करण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे भरतीच्या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ निम्म्यावर आला असून, आमचे विमा सल्लागर आणि विक्री व्यवस्थापक यांची उत्पादनक्षमता वाढली आहे.’

‘डिजिटल अॅसेटच्या वापरामुळे आम्हाला यंत्रणेअंतर्गत प्रभावी कार्यक्षमता रूजवण्यास आणि कामकाजावरील खर्चात बचत करणे शक्य झाले आहे. डिजिटल अॅसेटच्या मदतीने आमच्या विक्री कर्मचाऱ्यांना सक्षण केल्यामुळे कंपनीला चांगल्या दर्जाचे प्रतिनिधी नेमण्यास, त्यांना लवकरात लवकर कंपनीत रूजू करून घेण्यास आणि जास्तीत जास्त ग्राहकांना त्यांचे जीवनध्येय साकारण्यास मदत करण्याचे सामर्थ्य लाभले आहे,’ असे संगल यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search