Next
विकी कौशल साकारणार ‘अश्वत्थामा’
दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते रॉनी स्क्रूवाला पुन्हा एकत्र
BOI
Tuesday, April 16, 2019 | 05:33 PM
15 0 0
Share this article:

 
मुंबई : ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता विकी कौशल सर्वांच्याच मनात घर करून राहिला आहे. त्यानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. ‘उरी’चे दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते रॉनी स्क्रूवाला हे पुन्हा एकदा एकत्रित येत एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. ‘अश्वत्थामा’ यांच्या जीवनावर हा चित्रपट असून त्यात त्यांनी पुन्हा विकीला घेण्याचे ठरवले आहे.

‘उरी’च्या यशानंतर या दिग्दर्शक-निर्माता जोडीने एक बिग बजेट चित्रपट आणण्याचे ठरवले आणि त्यात विकीला प्रमुख भूमिकेत घेण्याचे निश्चित केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा आगामी चित्रपट अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आधारित असेल आणि विकी या चित्रपटात अश्वत्थामा यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनी ही प्राथमिक माहिती दिली असून विकीनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची हिंट दिली आहे. 

चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू असून पुढील वर्षी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान करण जोहरच्या आगामी ‘तख्त’ या विशेष चित्रपटातही विकी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट, रणवीर सिंग, जान्हवी कपूर, अनिल कपूर, करिना कपूर, भूमी पेडणेकर यांसारखी तगडी कलाकार मंडळी असतील. यात एक मुघल काळातील कथा दाखवण्यात आली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search