Next
नाशिक रोडला शिवजयंतीची जल्लोषात तयारी
BOI
Monday, February 18, 2019 | 11:33 AM
15 0 0
Share this story

नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू असून, या ठिकाणी मोठे व्यासपीठ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नाशिक : नाशिक रोड येथे सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीयांकडून शिवजयंतीची तयारी मोठ्या जल्लोषात सुरू आहे. नाशिक रोडवरील शिवाजी पुतळा परिसरात शिवजयंती समितीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून विविध देखावे, व्यासपीठ उभारण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.

१९ फेब्रुवारीची म्हणजेच शिवजयंतीची जय्यत तयारी चालू असून, नाशिक रोड परिसर भगवेमय झाला आहे. सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवप्रेमी हे एकत्र येऊन सध्या नाशिक रोडमध्ये शिवजयंतीची तयारी करताना दिसत आहेत. सर्वपक्षीय शिवजयंती समितीचे हे दुसरे वर्ष असून, ही परंपरा अविरतपणे चालत राहणार असल्याची प्रतिक्रिया समितीचे समन्वयक शिरीष लवटे यांनी व्यक्त केली आहे.  



युवक-युवतींनी आपल्या दुचाकीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावून फिरत असल्यामुळे नाशिक रोड परिसरात या शिवजयंतीला एक सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूप आले आहे. या उत्सवासाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मोठे व्यासपीठ उभारण्याचे काम सुरू असून, शिवभक्तांना दर्शनासाठीही येथे व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे नाशिक रोड येथे बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांना पुलाखालून प्रवेश नाकारण्यात आला असून, पुलावरून या गाड्यांना रस्ता मोकळा करून देण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभणार आहे. नाशिक रोड येथील मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या कमानी उभारण्याचे कामही जोरात सुरू आहे.

समितीचे समन्वयक शिरीष लवटे, कार्यकारणी अध्यक्ष राजेश फोकणे, कार्याध्यक्ष साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष संतोष क्षीरसागर, बापू सापुते, सरचिटणीस विक्रम कोठुळे, खजिनदार शिवाजी हांडोरे, नितीन चिडे, लकी ढोकणे, किशोर जाचक यांच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्ते यासाठी मेहनत घेत आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link