Next
गॅब्रिएल मार्केझ, एलिझाबेथ बॅरेट, श्रीनिवास बनहट्टी
BOI
Tuesday, March 06, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड’ या कादंबरीसाठी नोबेल मिळवणारा गॅब्रिएल मार्केझ, ‘हाउ डू आय लव्ह दी?’ या कवितेने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली एलिझाबेथ बॅरेट आणि लेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असणारे श्रीनिवास नारायण बनहट्टी यांचा सहा मार्च हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’ मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........ 
गॅब्रिएल गार्सिआ मार्केझ 

सहा मार्च १९२७ रोजी कोलंबियामध्ये जन्मलेला गॅब्रिएल गार्सिआ मार्केझ ऊर्फ गॅबो हा २०व्या शतकातला फार मोठा कथाकार, कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला १९८२ सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. 

‘लीफ स्टॉर्म’ ही त्याची एका फ्रेंच डॉक्टरचा अंत्यविधी उरकण्याची जबाबदारी आलेल्या एका कर्नलची कथा सांगणारी पहिली लघुकादंबरी. त्याच्या लहान नातवाला आयुष्यात प्रथमच होणारी मृत्यूची ओळख आणि कर्नलच्या मुलीचा दृष्टिकोन मांडणारी कथा त्यात होती. ही त्याची स्वतःची लाडकी कादंबरी होती. 

त्यानंतर त्याने तब्बल अठरा महिने खपून लिहिलेली ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्युड’ ही कादंबरी तुफान गाजली, अफाट खपली आणि त्याला नोबेल देऊन गेली. या कादंबरीचं जगभरच्या समीक्षकांनीही प्रचंड कौतुक केलं. ‘मॅजिक रिअलिझम’चा ही कादंबरी उत्तम नमुना ठरली! 

एका हुकुमशहाची कथा मांडणाऱ्या ‘ऑटम ऑफ दी पेट्रिआर्क्स’ या त्याच्या पुढच्या कादंबरीचंसुद्धा चांगलं स्वागत झालं. पुढच्या दोन-तीन कादंबऱ्यांपैकी ‘लव्ह इन दी टाइम ऑफ कॉलरा’ ही प्रेमकथा खूप गाजली. 

क्रॉनिकल्स ऑफ डेथ फोअरटोल्ड, ऑफ लव्ह अँड अदर डीमन्स, मेमरीज ऑफ माय मेलँन्कली होअर्स, नो वन राइट्स टू दी कर्नल, दी जनरल इन हिज लॅबिरिन्थ, न्यूज ऑफ ए किडनॅपिंग, अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

१७ एप्रिल २०१४ रोजी त्याचा मेक्सिकोमध्ये मृत्यू झाला.
..........

एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग 

सहा मार्च १९०६ रोजी डरममध्ये जन्मलेली एलिझाबेथ बॅरेट ही १९ व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांमधली अत्यंत लोकप्रिय कवयित्री. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तिने कविता करायला सुरुवात केली होती. 

चाळीसच्या दशकात ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. तिचा कवितासंग्रह वाचूनच प्रसिद्ध कवी रॉबर्ट ब्राउनिंग तिच्या प्रेमात पडला होता. तिचा कवितासंग्रह वाचून त्याने पाठवलेल्या पहिल्याच पत्रात त्याने आपल्या प्रेमाची कबुली देऊन टाकली होती - ‘आय लव्ह युअर व्हर्सेस विथ ऑल माय हार्ट, डिअर मिस बॅरेट. आय डू, अॅज आय से, लव्ह दीज बुक्स विथ ऑल माय हार्ट, अँड...आय लव्ह यू टू!...’ ..त्यांचं प्रेमप्रकरण आणि त्यांची प्रेमपत्रं प्रचंड गाजली होती. ‘ऑरोरा ली’ हा तिचा अत्यंत गाजलेला काव्यसंग्रह. 

हाउ डू आय लव्ह दी?, सॉनेट २४, दी रनअवे स्लेव्ह अॅट पिल्ग्रिम्स पॉइंट, दी क्राय ऑफ दी चिल्ड्रेन, ग्रिफ यांसारख्या तिच्या अनेक कविता जगप्रसिद्ध झाल्या.  

तिने आपल्या लेखनातून बालकामगार, गुलामगिरी आणि स्त्रियांवरचे जुलूम यांसारख्या त्याकाळच्या बऱ्याच समस्यांना वाचा फोडली होती. 

२९ जून १८६१ रोजी तिचा फ्लॉरेन्समध्ये मृत्यू झाला. 
.......

श्रीनिवास नारायण बनहट्टी

सहा मार्च १९०१ रोजी जन्मलेले श्रीनिवास नारायण बनहट्टी हे लेखक आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते साक्षेपी संशोधक म्हणूनही प्रसिद्ध होते. 

ते भारतीय राज्यघटनेच्या भाषांतर समितीचे सदस्यही होते. 

त्यांना १९६९ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

कृष्णविजय, विष्णु कृष्ण चिपळूणकर, नाट्याचार्य देवल, जोडयात्रा, श्री ज्ञानदेवी-प्रतिशुद्ध संहिता, सुगम मराठी शब्दकोश, ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा, असं त्यांचं साहित्य प्रसिद्ध आहे. 

२२ एप्रिल १९७५ रोजी त्यांचं निधन झालं.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link