Next
राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांचा निरोप समारंभ
प्रेस रिलीज
Friday, March 30, 2018 | 11:58 AM
15 0 0
Share this story

पुणे : राज्यसभेच्या निवृत्त होत असलेल्या सर्व सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली असून, त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

‘निवृत्त होत असलेले सदस्य सामाजिक जीवनात अधिक प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी राज्यसभेतल्या निरोप समारंभात व्यक्त केला. निवृत्त होत असलेल्या प्रत्येक सदस्याचे वेगळे महत्त्व असून, प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले आहे. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी त्यांच्या क्षमतांनुसार उत्तम काम केले असून त्यांचे योगदान देश कधी विसरू शकणार नाही’, असे मोदी म्हणाले.

मोदी यांनी ज्येष्ठ सदस्य असलेल्या वरिष्ठ सभागृहाचे विशेष महत्त्व आहे. धोरणनिर्मितीत ते महत्ताची भूमिका बजावत असल्याचे सांगून निवृत्त होणाऱ्या अनेक सदस्यांचा आणि त्यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.

प्रलंबित तीन तलाकसारख्या महत्त्वाच्या निर्णयप्रसंगी संसदेचे सदस्य संसदेचा भाग नव्हते, याबाबत पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. निवृत्त होत असलेल्या सदस्यांसाठी संसदेची तसेच पंतप्रधान कार्यालयाची दारे सदैव खुली असतील, असे सांगून महत्त्वाच्या मुद्यांवर विचार मांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी त्यांना केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link