Next
‘एमडीएई’तर्फे युवा अर्थतज्ज्ञ संशोधन स्पर्धा
प्रेस रिलीज
Friday, October 12, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अर्थशास्त्रामधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आघाडीवर असलेल्या संस्थापैकी एक मेघनाद देसाई अॅकॅडमी ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे (एमडीएई) युवा अर्थतज्ज्ञ संशोधन स्पर्धेच्या (वायइआरसी) द्वितीय पर्वासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय तरुणांमध्ये आर्थिक संशोधनाला आवडता विषय म्हणून रूजवण्याच्या प्रयत्नांच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी स्पर्धक असमानता आणि आयात पर्याय या विषयांसह चर्चेत असलेले विषय जसे की गिग इकॉनॉमी आणि फिन्टेकसारख्या विषयांवरील आपले थेसिस आणि सिद्धांत पाठवू शकतात. ही स्पर्धा कोणत्याही शाखेतील आणि पदवीच्या कोणत्याही वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. प्रत्येक गटात दोन सदस्य अपेक्षित असून, त्यात संकाय सल्लागाराचा समावेश असणे आवश्यक नाही.

याशिवाय, यावर्षी प्रस्तुत विद्यालयांतर्फे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गटांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही आणि गटातील सदस्य दोन वेगळ्या विद्यालयातील विद्यार्थीही असू शकतात. प्रथम पारितोषिक ७ हजार ५०० रुपये आणि ‘एमडीएइ’मध्ये संशोधन साहाय्यक म्हणून काम करण्याच्या संधीचा समावेश असेल. द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये असेल. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०१८ आहे. द्वितीय पर्वासाठी आतापर्यंत देशातील विविध शहरांमधून नऊ विद्यालये आणि २५ गटांनी अर्ज नोंदणी केली आहे.

‘एमडीएई’चे सह प्राध्यापक आणि अधिष्ठाता (फॅकल्टी) प्रा. इंद्रदीप घोष म्हणाले, ‘या उत्साह वाढविणाऱ्या स्पर्धेच्या आणखी एका पर्वाचे आयोजन करताना आम्हाला हर्ष होतो आहे. या स्पर्धेद्वारा, युवा अर्थतज्ज्ञांना त्यांचे ज्ञान आणि विशिष्ट कौशल्यांना विकसित करण्यासाठी एक अत्यंत सक्षम असा मंच निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही याकडे उद्याच्या अर्थतज्ज्ञांनासाठी शिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीचा एक सामायिक मंच म्हणून सुद्धा बघतो. यावर्षी, आम्ही स्पर्धकांना त्यांचे गट सदस्य आणि विषय निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य देत आहोत. या वर्षी आम्हाला प्राप्त होणाऱ्या उद्बोधक आणि मनोरंजक सहभागाविषयी विचार करताना आम्ही खूप उत्साही आहोत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link