Next
नर्तक
BOI
Wednesday, July 24, 2019 | 10:23 AM
15 0 0
Share this article:

मराठवाड्यातील दिनेगावातील शिवा पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा; पण लहानपणापासून त्याला नृत्याचे वेड. त्यातून धारवाडकर मॅडमची नाराजी पत्करून त्याने भरतनाट्यमचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. जात-पात वृत्तीमधील विषमता यांचा अनुभव घेऊन शिवा पुण्यात बस्तान ठोकतो. अरंगेत्रमचा कार्यक्रम होतो; पण पुढे काय हा प्रश्न उरतोच. यात पोटा-पाण्याच्या समस्येबरोबरच नृत्याच्या पुढील शिक्षणाची चिंता त्याला होती. 

नृत्यासाठी शोधाशोध करून, टक्केटोणपे खात गुरूंची भेट होते; पण जात आडवी येतच राहते. त्यातून उभे राहत शिवा नृत्याचे वर्ग सुरू करतो. त्याला चांगला प्रतिसादही मिळतो; पण नृत्याचे पुढील धडे घेण्याचे वेध लागतात आणि नृत्यगुरू अंजनी अन्नाप्रगाडा यांची तालीम मिळते. त्यानंतर मान, प्रसिद्धी, विदेश दौरे असे सर्व मिळत गेले. तरी पोटाचा प्रश्न सुटत नाही. कला क्षेत्रातील राजकारणामुळे अंगी कला असूनही जगण्यासाठी त्याचा काही उपयोग होत नाही. यातूनच शिवा पाटीलची नृत्यकला कायमची थांबते. या कथेतून एका कलावंताची फरपट दिसतेच; पण असंवेदनशील जगाचे प्रतिबिंबही डोकावते.

पुस्तक : नर्तक
लेखक : विलास एखंडेपाटील
प्रकाशक : व्हिजन प्लस फाउंडेशन
पाने : २२७
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search