Next
डॉ. लीला दीक्षित
BOI
Sunday, February 04, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

कोकणातल्या आपल्या जन्मापासूनच्या रम्य आठवणी आपल्या पुस्तकातून जिवंत करणाऱ्या बालसाहित्यकार डॉ. लीला गणेश दीक्षित यांचा चार फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय..
......
चार फेब्रुवारी १९३५ रोजी गुहागरमध्ये जन्मलेल्या डॉ. लीला गणेश दीक्षित या कवयित्री आणि बालसाहित्यकार म्हणून ओळखल्या जातात. बालपणी घराच्या खिडकीतून वाऱ्याची सळसळ आणि समुद्राची गाज ऐकत मोठ्या झालेल्या लीला दीक्षित यांनी आपल्या कोकणातल्या आठवणींवर ‘घर आमचं कोकणातलं’ हे सुंदर पुस्तक लिहिलं आहे. घरामागची सुखद गारवा असणारी वाडी, समुद्राची गाज, पायाला होणारा ओल्या गार वाळूचा स्पर्श, समुद्राच्या कडेने अलगद आत शिरताना दिसणारी लाटांची झुंबरं, पावसाळ्यात रात्री झाडांवर चमकणारे काजवे, कुंपणावरचे लाल डुकलीचे सरडे यांचं मंत्रमुग्ध करणारं वर्णन या पुस्तकातून वाचायला मिळतं. 

दीक्षित यांनी ‘प्राचीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्त्री दर्शन’ या विषयावर पीएचडी प्राप्त केली होती. त्यांना चार राज्य पुरस्कार, भा. रा. तांबे पारितोषिक, ना. धों. ताम्हनकर पारितोषिक, वा. ल. कुळकर्णी पारितोषिक, दि. के. बेडेकर पारितोषिक आणि मसाप पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं आहे. 

गोत, चंदनवेल, अमोल कथा, आनंदयोगिनी, अंतरीचे धावे, असा उगवला स्वातंत्र्यसूर्य १ ते ३, बिल्वदल, गंमत गाव, गाणारे झाड, घर आमचं कोकणातलं, गोत, कथा परशुरामाची, मैत्री, मैत्री मोलाची, मुद्रा, रसमुद्रा, ...आणि फुलांना मिळाले रंग!, आजोबांचे घर, अक्षय शिदोरी, क्रांतिकारकांच्या कथा, शुभंकरोमि – असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

१३ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांचं निधन झालं.

डॉ. लीला दीक्षित यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉम वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search