Next
जॉन अपडाईक, वीर वामन जोशी
BOI
Sunday, March 18, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

हेन्री बेख या चाळीशीतल्या एका उदयोन्मुख लेखकाची कहाणी आपल्या तीन धम्माल कादंबऱ्यांमधून सांगणाऱ्या जॉन अपडाईकचा आणि प्रसिद्ध नाटककार वीर वामन जोशी यांचा १८ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.......        
जॉन अपडाईक  

१८ मार्च १९३२ रोजी पेनसिल्व्हेनीयामध्ये जन्मलेला जॉन अपडाईक अमेरिकन मध्यमवर्गीय समाजाचं चित्रण करणारा कथाकार, कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होता.

द कार्पेन्टर्ड हेन अॅन्ड अदर टेम क्रिचर्स हा त्याचा काव्यसंग्रह गाजला आणि पाठोपाठ आलेली ‘द पुअरहाउस फेअर’ ही कादंबरीसुद्धा लोकांना आवडली. 

‘रॅबिट, रन’ या कादंबरीने तो खऱ्या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात आला. हॅरी ‘रॅबिट’ अॅन्गस्टॉर्म या एका अॅथलिटची कथा मांडणारी ही कादंबरी चांगलीच गाजली. त्याने पुढे त्याचे रॅबिट रीडक्स, रॅबिट इज रिच आणि रॅबिट अॅट रेस्ट असे भाग लिहिले आणि ते सर्वच लोकप्रिय झाले. 

द विचेस ऑफ इस्टविक आणि द विडोज ऑफ इस्टविक अशा त्याच्या पुढच्या कादंबऱ्याही गाजल्या. द विचेस ऑफ इस्टविकवर १९८४ साली शेर, मिशेल फायफर आणि सुझन सरेन्डनचा धमाल सिनेमाही आला होता. 

हेन्री बेख या चाळीशीतल्या एका उदयोन्मुख लेखकाची कहाणी सांगणाऱ्या तीन कादंबऱ्या त्याने लिहिल्या. बेख: अ बुक, बेख इज बॅक आणि बेख अॅट बे! या तीनही विनोद्प्रचुर कादंबऱ्यांमधून त्याने लेखकाची यशस्वी होण्याची धडपड धमाल पद्धतीने रंगवली होती.       
 
२७ जानेवारी २००९ रोजी त्याचा डॅनव्हर्झमध्ये मृत्यू झाला.
....

वीर वामन गोपाळ जोशी 

१८ मार्च १८८१ रोजी अमरावतीमध्ये जन्मलेले वामन गोपाळ जोशी हे ‘वीर’ वामनराव जोशी म्हणून प्रसिद्ध असणारे पत्रकार आणि नाटककार!

सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’  ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केलं. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’  हे साप्ताहिक चालवलं होतं. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. 

त्यांनी लिहिलेली ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘रणदुंदुभि’ ही नाटकं गाजली होती. विशेषतः दीनानाथ मंगेशकरांनी गायलेलं रणदुंदुभि नाटकातलं ‘परवशतापाश दैवे’ हे पद प्रचंड लोकप्रिय झालं होतं. त्यांनी आपल्या लेखनातून जनमानसांत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला होता. 

तीन जून १९५६ रोजी त्यांचा अमरावतीमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link