Next
अस्थिरोग निदान शिबिराला प्रतिसाद
BOI
Thursday, January 11 | 04:09 PM
15 0 0
Share this story

सोलापूर : ‘समाजातील गोरगरीब लोकांना शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्या आरोग्याची तपासणी करणे शक्य होत नाही. म्हणून आम्ही गावात जाऊन शिबिराच्या माध्यमातून मोफत तपासणी व औषधोपचारांची व्यवस्था करतो,’ असे पंढरपूर येथील निकम हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत निकम यांनी सांगितले. 

सात जानेवारी रोजी रोपळे बुद्रुक गावात अस्थिरोग निदान आणि तपासणीच्या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच दिनकर कदम होते. दिवसभरात सुमारे तीनशे रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले.  

या वेळी व्यासपीठावर स्थानिक स्कूल कमिटी सदस्य शिवाजी पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश कदम, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य बाळासाहेब पाटील, बाळासाहेब भोसले, डॉ. हनुमंत खपाले, नितीन कदम, विलास भोसले, योगप्रशिक्षक अरुण भोसले, बाळकृष्ण भाले आदी मान्यवर उपस्थित होते. 

ग्रामपंचायत सदस्य नागनाथ माळी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. हे शिबिर रोपळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये घेण्यात आले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विश्वंभर कदम यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link