Next
‘द क्लिक्स २०१८’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
BOI
Saturday, January 19, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this story

पुणे : येथील ‘धवलगिरी अॅडव्हेंचर्स’ या गिर्यारोहन संस्थेच्या ‘द क्लिक्स २०१८ (The clix - 2018)’ या चौथ्या वार्षिक छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालनात करण्यात आले आहे. या प्रदर्शनात संस्थेतर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी टिपलेल्या छायाचित्रांचा समावेश असेल.

शनिवार-रविवार (१९ आणि २० जानेवारी), सकाळी १० ते रात्री नऊ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खूले असणार आहे. शनिवारी (१९ जानेवारी) सायंकाळी साडे पाच वाजता पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व मानचिन्हे देण्यात आली. ज्येष्ठ छायाचित्रकार व स्पर्धेचे परीक्षक चंद्रशेखर बापट या वेळी उपस्थित होते. 

पक्षी व वन्यप्राणी, कीटक व सरपटणारे प्राणी, किल्ले व मंदिरे, अफ्रिकेच्या जंगलातील वन्य जीवन, पाण्यातील पक्षी, साप व गरूडाची झूंज, वाघांच्या अनेक मुद्रा, रंगीत पक्षी, सरडे, हिमालयातील पर्वतरांगा, युरोप व अमेरिकेतील निसर्गसौंदर्य, भरारी घेणारे पक्षी, बिबटे यांची छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. ६० स्पर्धकांनी या प्रदर्शनात भाग घेतला असून त्यांची सुमारे २७० छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत. रविवारी (२० जानेवारी) नवोदित छायाचित्रकारांना वन्य छायाचित्रण आणि नाईट फोटोग्राफी याविषयी याठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link