Next
कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार
प्रेस रिलीज
Tuesday, September 04 | 02:08 PM
15 0 0
Share this story

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी (डावीकडून) निमिष माहेश्वरी, नितीन गडकरी, कल्याण जाधव व अनिर्बन सरकार.
पुणे : येथील ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’ आणि ‘केजे इन्फ्रा’चे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांना ‘इन्फ्रा आयकॉन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘नवभारत इन्फ्रा कॉनक्लेव्ह अँड अवार्ड’ कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कल्याण जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘डेक्कन वॉटर’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिर्बन सरकार, ‘नवभारत’चे प्रमुख प्रबंधक निमिष माहेश्वरी आदी उपस्थित होते. 

कल्याण जाधव यांनी ‘केजे इन्फ्रा’च्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि ‘केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान लक्षात घेऊन, त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link