Next
‘कलारंग’तर्फे ‘त्रिवेणी संगम’ कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Tuesday, February 26, 2019 | 02:19 PM
15 0 0
Share this article:

अभिनेते राहूल सोलापूरकर आणि अतुल परचुरे

पिंपरी-चिंचवड : येथील ‘कलारंग’ संस्थेतर्फे पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘त्रिवेणी संगम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्यक्तिचित्रण आणि अभिवाचन यांमधून ‘पुलं’च्या अनेकविध पैलूंचे दर्शन घडवले गेले. त्यांच्या साहित्य आणि कविता यांच्या विविधरंगी आठवणीत पिंपरी-चिंचवडचे रसिक रमून गेले. 

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने ‘कलारंग सांस्कृतिक कला संस्थे’तर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘राज्य लेखा समिती’चे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले. 

या वेळी गायिका स्वप्नजा लेले व गायक संदीप उबाळे यांच्या सुमधूर गायनांचा आस्वाद रसिकांनी घेतला. बाबूजी आणि ग. दि. मा़डगुळकर यांच्या गाण्यांना रसिकांनी दाद दिली. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान त्याचबरोबर अभिनेते रमेश भाटकर, बहुआयामी व्यक्तिमत्त्व सरोज राव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रवींद्र खरे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

पु. ल. देशपांडे यांची भूमिका साकारलेले अभिनेते अतुल परचुरे यांची अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी या वेळी मुलाखत घेतली. ‘भाईं’ची कॉपी कधीही आणि कुणालाही करता येणे खूप अवघड आहे. भाई ज्यांना समजले त्यांनाच ती भूमिका करता येते. अशी भूमिका मला करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. विनोदी लेखन, प्रवासवर्णने, नाटक, व्यक्तिचित्रणात्मक लेखन अशा विविधांगी लेखनातून त्यांनी मराठी साहित्य प्रगल्भ केले आहे. व्यक्ती आणि वल्लीमधील भाईंच्या भूमिकेसाठी मला विचारण्यात येणे हीच मी माझ्या कामाची पावती समजतो’, अशा भावना अतुल परचुरे यांनी व्यक्त केल्या. 

राज्यलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन म्हणाले,  ‘कोणत्याही क्षेत्रात कोणाशीही स्पर्धा करू नका. स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:चे असे स्थान निर्माण करा.’ बंधूता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे म्हणाले, ‘पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त का होईना त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो.’ 
‘पुलं’ची प्रवासवर्णने, भाषिक ताकद त्याचबरोबर ‘पुलं’च्या बहुभाषित्वाचे पैलू रसिकांसमोर उलगडण्याचे काम या वेळी अभिनेते अतुल परचुरे यांनी केले. या वेळी राहूल सोलापूरकर यांनी, ‘पुलं’नी लिहिलेल्या काही पत्रांचे संदर्भ वाचनही केले. 

या वेळी  महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रमोद निसळ, बंधुता प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष प्रकाश रोकडे, मधूकर बाबर, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सदस्य शीतल शिंदे, स्वप्निल म्हेत्रे, शारदा सोनावणे, बाळासाहेब कोकाटे, उमा खापरे, राजेंद्र घावटे, पितांबर लोहार, विश्वास मोरे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, कमल घोलप, सुजाता पालांडे, सुरेश पाटोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गोरखे यांनी केले, तर आभार शैलेश लेले यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search