Next
‘रिलायन्स’ आणि ‘प्लॅन सी’तर्फे ‘चाणक्य’ची घोषणा
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this story

मुंबई : अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि फ्रायडे फिल्मवर्क्स कंपनीच्या प्लॅन सी स्टुडिओतर्फे ‘चाणक्य’ भारतीय इतिहासातील राजकीय विचारवंत, तत्त्ववेत्ते, अर्थतज्ज्ञ आणि शाही सल्लागाराच्या या पुढील सिनेमाची घोषणा करण्यात आली.

भव्य नाट्य असलेल्या या चित्रपटात सुपरस्टार अजय देवगण यांची भूमिका असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रतिभावान लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक नीरज पांडे करणार आहेत. ख्रिस्तपूर्व काळात चौथ्या शतकात चाणक्य हा महान योद्धा होऊन गेला, परंतु एक शिक्षक, अर्थतज्ज्ञ आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांची खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रगुप्त मौर्य यांची कारकिर्द घडवण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता.

नीरज पांडेया सिनेमाविषयी नीरज पांडे म्हणाले, ‘चाणक्य हा सिनेमा करण्यासाठी मी बऱ्याच काळापासून प्रयत्न करतोय. हे काम म्हणजे माझे पॅशन आहे, अजयने साकारलेल्या जिनिअस धोरणी व्यक्तिमत्त्वाचे चित्रणही प्रेक्षकांना फार आवडेल याची मला खात्री वाटते.’

अजय देवगण म्हणाले की, ‘चाणक्य साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी नीरज पांडे यांचे काम खूप जवळून पाहिले आहे. नीरज अतिशय सुस्पष्टपणे व पॅशनने ही गाथा सांगतील याची मला खात्री आहे.’

‘प्लॅन सी’च्या शीतल भाटिया म्हणाल्या, ‘चाणक्य या व्यक्तिमत्त्वाने आपल्याला नेहमीच भारून टाकलेले आहे, त्यांच्या राजकीय क्रांतीने भारतीय प्राचीन इतिहासाचा गतिमार्ग बदलून टाकला आहे. ही भव्य कथा आमच्या प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’

रिलायन्स एंटरटेन्मेंटचे शिबाशिष सरकार म्हणाले, ‘चाणक्यसारख्या व्यक्तिमत्त्वाभोवती कायम गूढ वलय आणि एक अस्तित्व राहिले आहे. ‘चाणक्य’ हा सिनेमा आजच्या प्रेक्षकांकडून नक्की स्वीकारला जाईल, याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही, ‘चाणक्य’ हे स्वतः प्रात्यक्षिक अध्ययन आणि अध्यापनातील ग्रेट मास्टर होते, त्यावर आधारित उत्तम व महत्त्वाची माहिती या सिनेमातून मिळणार आहे. नीरज पांडे आणि अजय देवगण यांचे चाहते त्यांच्या एकत्र येण्याची बऱ्याच कालावधीपासून वाट पाहात आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link