Next
व्होडाफोनतर्फे केवळ ९९९ रुपयांमध्ये फोर जी स्मार्टफोन
प्रेस रिलीज
Wednesday, October 25 | 06:12 PM
15 0 0
Share this story

 
मुंबई :  दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्होडाफोन आणि मायक्रोमॅक्स यांनी एकत्र येऊन देशातील सर्वात स्वस्त केवळ ९९९ रुपयांतील फोर जी स्मार्टफोन सादर केला आहे. सर्व रिटेल आउटलेट आणि व्होडाफोन दालनांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हा फोन उपलब्ध होणार आहे.

‘भारत 2 अल्ट्रा’ हा मायक्रोमॅक्सचा यशस्वी ‘भारत सिरीज’मधला फोर जी स्मार्टफोन असून,  व्होडाफोन सुपरनेट फोर जी सेवेसह उपलब्ध होणार आहे. सध्याच्या आणि नव्या व्होडाफोनच्या ग्राहकांना मायक्रोमॅक्स भारत-२ अल्ट्रा स्मार्टफोन २ हजार ८९९ रुपयांना विकत घेता येईल – आणि या वेळी ३६ महिन्यांसाठी केवळ १५० रुपयांचे रिचार्ज करायचे आहे. १८ महिन्यांच्या पूर्ततेनंतर वापरकर्त्यांना ९०० रुपयांची रक्कम परत मिळेल आणि अन्य १८ महिने झाल्यावर आणखी एक हजार रुपये परत मिळतील. व्होडाफोनच्या एम-पेसा वॉलेटमध्ये ही रक्कम टाकली जाईल, ही रक्कम ग्राहक आपल्या सुलभतेनुसार डिजिटली वापरू शकतात किंवा रोख रक्कम काढून घेऊ शकतो.
 
मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा म्हणाले, ‘स्मार्टफोन वापरणाऱ्यांच्या पहिल्या पिढीच्या संपादनाचे ध्येय भारत सिरीजने समोर ठेवले आहे. यासाठी व्होडाफोनबरोबर भागीदारी केल्याने, स्मार्टफोनच्या स्वीकृतीतील पुढचा टप्पा गाठण्यास मदत होणार आहे, आतापर्यंत असे फोन न वापरणाऱ्या ग्राहकांना अपग्रेड करून फिचर फोन ते स्मार्टफोनपर्यंत आणण्यात येईल. ही उपकरणे परवडणाऱ्या किंमतीत तर असतीलच, शिवाय कमी किंमतीतील डेटा पॅकमुळे स्मार्टफोनची स्वीकृती लवकर होऊ शकेल, सध्या तरी या वापरात खूपच अंतर आहे. मायक्रोमॅक्सला लोकांना सर्वोत्तम उपकरण वापरण्याचा अनुभव द्यायचा आहे, तोही परवडणाऱ्या किंमतीत आणि भारत श्रेणीतच, याअंतर्गत आतापर्यंत तब्बल २ दशलक्षांपेक्षा जास्त हँडसेटची विक्री झाली आहे’.
 
  व्होडाफोन इंडियाचे कन्झ्युमर बिझनेसचे संलग्नित संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘ फोर जी स्मार्ट फोन आतापर्यंत कधीही सादर न करण्यात आलेल्या, म्हणजेच ९९९ रुपयांमध्ये सादर करण्यात येत आहे, अशा प्रकारे उत्पादनांचे लोकशाहीकरण करण्यासाठी मायक्रोमॅक्सबरोबर आम्ही भागीदारी करत आहोत, याचा आम्हाला आनंदच आहे. यामुळे स्मार्ट फोन घेण्याची इच्छा असते, परंतु परवडत नसल्याने तो घेता येत नाही, अशा देशातील लाखो लोकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. यामुळे सध्या फोर जी  न वापरणाऱेही ते वापरू शकतील आणि व्होडाफोन सुपरनेट फोर जीचा आनंद घेऊ शकतील. भारत-२ अल्ट्राची वैशिष्ट्ये म्हणजे सुरेख डिझाइन, १.३ गिगाहर्ट्ज क्वाड कोअर प्रोसेसर, ५१२ एमबी रॅम, ४ इंचाचा डब्ल्यूव्हीजीए डिस्प्ले, ०.३ एमपीच्या फ्रंट कॅमेरा, २ एमपी रेअर कॅमेरा   आहे. याशिवाय हे उपकरण सीन, फ्रेम आणि बर्स्टसारख्या विविध पद्धतींसह येते, याच्या प्राथमिक वैशिष्ट्यांमुळे वापरकर्ते याचा आनंद लुटू शकतील. १३०० एमएएच बॅटरीच्या अँड्रॉइड मार्शमेलोसह हा हँडसेट सज्ज आहे, शिवाय यावर पूर्ण व्हिडिओ पाहणे सहज शक्य आहे. सोशल नेटवर्किंग आणि चॅट अॅप यामुळे स्मार्टफोनचा सर्वोत्तम अनुभव वापरकर्त्यांना मिळतो’.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link