Next
‘अॅटलास कॉप्को’तर्फे नवे रोटरी ड्रम ड्रायर
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 02:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : अॅटलास कॉप्को या आघाडीच्या एअर कॉम्प्रेसर्स व ट्रीटमेंट सिस्टीम्स उत्पादक कंपनीने नवे रोटरी ड्रम ड्रायर दाखल केले आहेत.

एअर ड्रायरनी कमीत कमी ऑपरेशनल खर्चामध्ये -४० अंश सेल्सिअस/-४० अंश एफ प्रेशर ड्यू पॉइंट (पीडीपी) अशी कामगिरी करावी, अशी अनेक उद्योगांची अपेक्षा असते. ड्रायरची कार्यक्षमता साधारणतः विजेचा वापर आणि कम्प्रेस्ड एअर पर्ज्डचे प्रमाण या दोन घटकांनी ठरवली जाते. सध्याचे बरेचसे एअर ड्रायर -४० अंश सेल्सिअस/-४० अंश एफ इतक्या स्थिर पीडीपीची व विजेच्या कमी वापराची अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत.

विश्वासार्हता वाढवण्यासाठी व -४० अंश सेल्सिअस/-४० अंश एफ पीडीपीची ऊर्जाक्षमता सुधारण्यासाठी अॅटलास कॉप्को ऑइल-फ्री एअर डिव्हिजनने नवे तंत्रज्ञान तयार केले आहे. अनेक वर्षे विकास व चाचण्या केल्यानंतर टीमने नवा एमडीजी रोटरी ड्रम ड्रायर सादर केला आहे. हा वापर करून विजेचा जवळजवळ शून्य खर्च असलेला स्थिर व खात्रीशीर -४० अंश सेल्सिअस/-४० अंश एफ पीडीपी असलेला अत्याधुनिक एअर ड्रायर आहे.

सोप्या करण्यात आलेल्या नव्या डिझाइनमध्ये उष्ण घटक व ब्लोअर नाहीत; तसेच कॉम्प्रेस्ड एअरचे नुकसान होत नाही. त्यामुळे त्याची ऊर्जाक्षमता अधिक आहे. सर्व प्रकारच्या कार्यांच्या स्थितीमध्ये ०.२ केडब्ल्यू इतका एकूण वीजवापर असलेला नवा एमडीजी एअर ड्रायर सादर होणे, हे कॉम्प्रेस्ड एअर मार्केटसाठी मोठे यश आहे.

ऑइल-फ्री एअर डिव्हिजनचे अध्यक्ष फिलिप अर्नेन्स म्हणाले, ‘एमडीजी ड्रायर्समुळे आम्हाला आता उच्च दर्जाची कॉम्प्रेस्ड एअर अपेक्षित असणाऱ्या व मालकीसाठी कमीत कमी एकंदर खर्च अपेक्षित असलेल्या ग्राहकांना वीजबचत करणारे उत्तम उत्पादन पुरवू शकणार आहोत.’

सर्वाधिक ऊर्जा-क्षमतेबरोबरच यामध्ये हलते भाग कमी आहेत. त्यामुळे मेंटेनन्स खर्च कमी आणि विश्वासार्हता अधिक आहे. सोप्या डिझाइनचा आणखी एक फायदा म्हणजे, ग्राहकांच्या प्रकल्पात ते कमी जागा व्यापतात. अॅटलास कॉप्कोच्या नव्या एमडीजी सेट्सने एअर ड्रायर तंत्रज्ञानासाठी नवी प्रमाणके निर्माण केली आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search