Next
भारतात डिजिटल अ‍ॅप्सचा झपाट्याने वापर
प्रेस रिलीज
Thursday, May 31, 2018 | 12:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जागतिक बँकिंग व पेमेंट तंत्रज्ञान पुरवठादार एफआयएसद्वारे नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतीय बँकिंग ग्राहकांनी डिजिटल बँकिंगला स्वीकारल्याचे दिसून आले आहे. पेमेंट करण्यासाठी ते मोबाइल वॉलेट्स व व्हर्च्युअल कार्ड्सना सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. डिजिटल अ‍ॅक्सेस भारतात पूर्णपणे विकसित स्तरावर पोहोचले आहे, म्हणनूच बँकामागील काही वर्षांपासून आपल्या डिजिटल क्षमतांचा विस्तार करत आहेत.

एफआयएसच्या चौथ्या वार्षिक परफॉर्मन्स अगेन्स्ट कस्टमर एक्सपेक्टेशन्स (पेस) अभ्यासाअंतर्गत भारतात एक हजाराहून अधिक बँकिंग ग्राहकांचे सर्वेक्षण करण्यात आले. ८६ टक्के भारतीय बँकिंग ग्राहक आपले बँक खाते तपासण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी फायनान्शिअल मोबाइल अ‍ॅप्सचा वापर करतात, असे या सर्वेक्षणातून दिसून आले. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. डिजिटल बँकिंगचा वाढता स्वीकार पाहता ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे डिजिटल सेवा महत्त्वपूर्ण आहे अशा क्षेत्रांवर बँकांना अधिक भर देता येईल.

भारतातील बँका ग्राहकांना विविध डिजिटल माध्यमे आणि सोयीच्या ठिकाणी शाखा उपलब्ध करून देऊन आपल्या ग्राहकांच्या अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ८२ टक्के भारतीय ग्राहक आपल्या प्राथमिक बँकेकडून समाधानी आहेत आणि खासगी क्षेत्राच्या बँकांचे ग्राहक सार्वजनिक क्षेत्राच्या बँकांच्या ग्राहकांच्या तुलनेत जास्त समाधानी दिसून आले. रिवॉर्ड प्रोग्रॅम्स सादर करून ग्राहकांच्या समाधानाचा स्तर वाढवणे बँकांना शक्य आहे, असेही या अहवालात सुचवण्यात आले आहे.

भारतीय ग्राहकांबाबत प्रमुख निष्कर्ष याप्रमाणे आहेत- १८ टक्के प्रतिसादकांना गेल्या वर्षी फसवणूकीचा अनुभव आला. जवळ-जवळ दोन तृतीयांश प्रतिसादकांकडे आर्थिक सल्लागार आहेत आणि इतर लोकांनी आर्थिक सल्ल्यासाठी  मित्र व कुटुंबांवर विश्‍वास ठेवण्याला प्राधान्य दिले. ९४ टक्के प्रतिसादकांनी आपल्या प्राथमिक बँकांद्वारे पुरवण्यात येणार्‍या सेवांऐवजी वैकल्पिक वित्तीय सेवांचा वापर केला.

‘एफआयएस’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी वेंकटचेलम म्हणाले, ‘डिजिटल अ‍ॅक्सेस आणि मोबाईल फायनान्शिअल अ‍ॅप्लिकेशन्स भारतीय ग्राहकांसाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण असल्याचे यावर्षीच्या पेस अहवालातून स्पष्ट होते. भारतीय अर्थव्यवस्था लेस कॅश इकोनॉमीकडे वळत आहे, अशावेळी बँका आपल्या ग्राहकांना डिजिटल क्षमता पुरवत आहेत. त्यामुळे, वित्तीय कृतींच्या व्यापक शृंखलेला प्रोत्साहन मिळू शकेल.’
 
‘डिजिटायझेशन जलदतेने विकसित होत आहे. त्यामुळे ग्राहकसमाधान वाढ होण्याच्या दृष्टीने बँकांना धोरणात्मकरित्या व्यक्तिगत ग्राहकांच्या गरजा व इच्छांना प्राधान्य द्यावे लागेल. पेस अभ्यासामध्ये हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले की, भारताच्या बँकांनी कशावर अधिक लक्ष केंद्रीत करावे आणि बँकिंग ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सेवा-उत्पादने आपण कशाप्रकारे उपलब्ध करून देऊ शकतो,’ असे वेंकटचेलम यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link