Next
भारतातील तरुण पिढी हृदयविकारांना बळी
BOI
Tuesday, July 17, 2018 | 12:34 PM
15 0 0
Share this story

मुंबई : इंडियन हार्ट असोसिएशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पन्नाशीच्या आतील भारतीयांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण हे पन्नास टक्के इतके असून, चाळीसहून कमी वय असलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण पंचवीस टक्के आहे खेड्यात रहाणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरांमधील लोकांना हृदयविकार होण्याची शक्यता तिप्पटीने जास्त आहे.

हृदयविकार हा प्रचंड ताणतणाव, खाण्याच्या वाईट सवयी, मद्य आणि धूम्रपान यांच्यामुळे होतो. शहरातील लोकांच्या धावपळीची आणि दगदगीची जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या वेळा आणि सवयी, खाण्यात फास्टफूडचे वाढते प्रमाण, कामाचा ताण यांमुळे खेड्यातील लोकांच्या तुलनेत शहरातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो.  

आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक जगात, तणाव प्रचंड वाढल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, शारीरिक निष्क्रीयता याचेही प्रमाण वाढत आहे; पण या तणावाला बळी पडण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी, दररोज कमीतकमी तीस मिनिटे, तरी ध्यान आणि व्यायामासाठी दिला, तर हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे इंडियन हार्ट असोसिएशनतर्फे सुचविण्यात आले आहे.
 
तणावपूर्ण जीवनशैली आणि कामाचे वाढलेले तास यामुळे खाण्याच्या सवयी अनियमित झाल्या आहेत. लोक फक्त जंक फुडच खातात असे नाही, तर त्यांच्या खाण्याच्या वेळाही नियमित नसतात. परिणामी, शरीराला आवश्यक असे पोषण मिळत नाही आणि त्याऐवजी, त्यात हानिकारक चरबी आणि विषारी पदार्थ भरले जातात. त्यामुळे लठ्ठपणा येतो. भारतातील लठ्ठ व्यक्तींची संख्या २०१०मधील १७.३ टक्क्यांवरुन वाढून २०१४मध्ये १९.५ टक्के झाली आहे.

मद्याच्या नियमित सेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होत आहेत. ज्याला ‘अऱ्हिदमियास’ म्हणतात. त्यामुळे रक्तातील ट्रायग्लिसराइड्सचे प्रमाणही वाढू शकते. त्याचबरोबर वाढीव कॅलरी सेवनही. धुम्रपानामुळे व्यायाम करण्याची क्षमता कमी होते आणि रक्ताची गुठळी होण्याची प्रवृत्ती वाढते.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी किंवा तणावाचा सामना करण्यासाठी निकोटीन किंवा मद्य यांसारख्या हानिकारक कृत्रिम उत्तेजकांची गरज नसल्याचे इंडियन हार्ट असोसिएशनने म्हटले आहे. त्याउलट पोषक अन्नाच्या सेवनाने आणि व्यायामाने आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत होता येईल, असे इंडियन हार्ट असोसिएशनने नमूद केले आहे. व्यसनांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आयुर्वेदीक औषधांचे सेवन करता येईल. ही औषधे शंभर टक्के नैसर्गिक असून, त्यांचे कसलेही दुष्परिणाम नाहीत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link