Next
तळजाई टेकडीवर रंगली ‘दिवाळी पहाट’
प्रेस रिलीज
Monday, November 05 | 12:31 PM
15 0 0
Share this story

तळजाई भ्रमण मंडळातर्फे तळजाई मंदिर पटांगणामध्ये आयोजित ‘पहाटरंग’ कार्यक्रमात गाणे सादर करताना राजेश दातार.

पुणे : येथील तळजाई भ्रमण मंडळातर्फे वसू बारसचे औचित्य साधून तळजाई मंदिर पटांगणामध्ये ‘पहाटरंग’ या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे चार वाजता तळजाई माता मंदिर व परिसरात असंख्य दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  

मंडळातर्फे गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात गायिका प्रज्ञा देशपांडे आणि राजेश दातार यांनी पहाटेचे रंग दाखवत एकापेक्षा एक गाणी सदर करून रसिकांची मने जिंकली. राजेश दातार यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर’, ‘जीवनात ही घडी’, ‘ओंकार स्वरूपा’, ‘पहाटे पहाटे मला जाग आली’, ‘डोल मोराच्या’, ‘जिवलगा कधीं येशील तू’, ‘लागा चुनरी में दाग’, अशी विविध गीते सादर केली. गायक नरेंद्र कुलकर्णी व प्रज्ञा देशपांडे यांनी देखील बहारदार गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.

निवडक गाण्यांना रसिकांनी ‘वन्स मोअर’ म्हणत प्रतिसाद दिला. अभिजित जायदे (तबला), शुभदा आठवले (पेटी), नितीन जाधव (साइड ऱ्हिदम) यांनी संगीतसाथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन अनिल वारनशिवार यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link