Next
उच्च शिक्षणात वाढला मुलींचा टक्का...
BOI
Saturday, August 04, 2018 | 01:50 PM
15 0 0
Share this story


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नुकत्याच करण्यात आलेल्या एका उच्च शिक्षण पाहणी अहवालातून पदव्युत्तर शिक्षणात देशभरात मुलींचा टक्का वाढला असल्याचे समोर आले आहे. या अहवालात मागील आठ वर्षांची आकडेवारी सादर करण्यात आली असून, शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांच्या तुलनेत सात टक्के अधिक मुलींनी प्रवेश घेतला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आहे आहे.  

मुलांपेक्षा मुलींमध्ये कष्ट करण्याची वृत्ती अधिक
मुलगा-मुलगी हा भेद काळानुसार आता कमी झाला असून परिणामी ग्रामीण भागातही घरातील मुलांच्या बरोबरीने मुलींना शिकवण्याच्या मानसिकतेत वाढ झाली असल्याचे या पाहणीत सिद्ध झाले आहे. अभ्यासाच्या बाबतीत मुलांपेक्षा मुलींमध्ये कष्ट करण्याची वृत्ती अधिक असल्याचे दिसून येते. गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावी निकालांमध्येही मुलीच आघाडीवर असल्यानेही हे सिद्ध झाले आहे. असे असताना पुढील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेच्या आधारावर निवड होत असताना अर्थातच मुलींची संख्या वाढत गेली. परिणामी आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या मुलींचे प्रमाण मुलांच्या प्रमाणापेक्षा सात टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच पदव्युत्तर शिक्षणातील मुलांचे प्रमाण घटल्याचे या पाहणीत समोर आले आहे. 

२०१७-१८मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदाच मुलांपेक्षा जवळपास १७ हजार अधिक मुलींनी नोंदणी केल्याचे दिसून आले. परंतु असे असले, तरी राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांमध्ये (आयआयटी) मुलींपेक्षा मुलांचेच प्रमाण अधिक असल्याचेही निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. उच्च शिक्षणात म्हणजेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर अनुक्रमे विज्ञान आणि वाणिज्य शाखेचा क्रमांक लागतो.  

विशेष बाब म्हणजे दोन वर्षांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी काही खास सवलती जाहिर केल्या होत्या. या सवलती विशेषतः एम. फिल. आणि पीएचडीच्या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आल्या होत्या. या सवलतींचाही उच्च शिक्षणात मुलींचा टक्का वाढण्यात फायदा झाला असल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. या धर्तीवर राज्यात पीएचडीच्या नोंदणीत २२ टक्के वाढ झाल्याचेही सांगण्यात आले आहे. 

                            आकडेवारी

वर्ष                        मुले                       मुली
२०१७ – १८ २ लाख १४ हजार २ लाख ३१ हजार
२०१६ – १७ २ लाख १७ हजार २ लाख १६ हजार 
२०१५ – १६ २ लाख ६ हजार १ लाख ९९ हजार 
२०१४ – १५ २ लाख ४० हजार १ लाख ९१ हजार 
२०१३ – १४ २ लाख ३७ हजार १ लाख ९६ हजार 
२०१२ – १३ १ लाख ८२ हजार १ लाख ३८ हजार 
२०११ – १२ २ लाख ८ हजार १ लाख ५५ हजार 
२०१० – ११ २ लाख ३३ हजार १ लाख ७३ हजार 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link