Next
बारावी परीक्षेत ‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे यश
प्रेस रिलीज
Thursday, June 13, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात सूर्यदत्ता कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. विज्ञान शाखेत प्रणव संजय मरळ याने ९०.१० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. महेश संजयकुमार किंगे याने ८३.२० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर किंजल शिरीष देशपांडे हिने ८२.४६ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.

कला शाखेत आर्शिया अजय आतकर ९०.६० टक्के गुणांसह प्रथम, सोफिया विनोदकुमार विलियम्स ९०.३० टक्के गुणांसह द्वितीय, तर साक्षी समर कामूलकर ८९.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेतील अनुष्का महेश उकिडवेने ८७ टक्के गुण मिळवत महाविद्यालयात प्रथम, वीरेंद्र ओमसिंग राजपुरोहित याने ८४.३० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर दीपाली रमेश पाल हिने ८३.०७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत सूर्यदत्ता महाविद्यालयात चालणाऱ्या कोणत्याही अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती लागू आहे. बीएस्सी इन अॅनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट कॉम्प्युटर सायन्स, बीबीए-सीए, बीबीए-आयबी आणि बीकॉम या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. 
 
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्राध्यापक, कर्मचारी यांची मेहनत घेतली. त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास, प्रोत्साहन, अतिरिक्त मार्गदर्शन केले. महाविद्यालाच्या मुलांनी शिक्षणाबरोबरच विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही आपला ठसा उमटविला. या यशाबद्दल प्रा. डॉ. चोरडिया, सुषमा चोरडिया यांनी प्राचार्या किरण राव यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search