Next
तनिष्कतर्फे ‘शून्य घट’ योजना
प्रेस रिलीज
Tuesday, March 06 | 03:06 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतात पहिल्यांदाच, ‘तनिष्क’ या दागिन्यांच्या सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅंडने अनोखी ‘शून्य घट’ योजना आणली आहे. सोनेप्रेमींसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी आहे. २२ कॅरेट शुद्धतेच्या जुन्या सोन्याच्या मोबदल्यात नवीन सोने,तेही शून्य टक्के घट काढून आणि प्रत्येक दहा ग्रॅम सोन्याच्या बदल्यात (अटी लागू) ३३६० रुपयांपर्यंत जास्त रक्कम मिळण्याच्या संधीसह ही योजना तनिष्कच्या सर्व शोरूम्समध्ये उपलब्ध आहे.  

या योजनेविषयी माहिती देताना ज्वेलरी विभागाच्या मार्केटिंग उपाध्यक्ष दीपिका सभरवाल तिवारी म्हणाल्या, ‘तनिष्कचा तत्वनिष्ठ आणि चोख व्यवहार ग्राहकांना गेली वर्षानुवर्षे संतुष्ट करत आला आहे. ही योजना म्हणजे या विश्वासाचेच फलित आहे. या योजनेद्वारे चोख व्यवहार तर होतोच पण ग्राहकांच्या आवडीनिवडीचाही मान राखला जातो. योजनाबद्ध आणि पूर्वनियोजित सोने खरेदीसाठी ओळखले जाणारे भारतीय ग्राहक या योजनेद्वारे त्यांच्या जुन्या सोन्याच्या बदल्यात नवे दागिने नक्कीच घेतील. तनिष्कचा सोने खरेदी भाव त्यांच्या विक्रीच्या भावाइतकाच असतो. येथे तुमचे सोने तुमच्या समोर वितळवून त्याचे वजन केले जाते.  अत्यंत अद्ययावत अशा कॅरेटमीटरवर सोन्याची शुद्धता तपासली जाते.  कुठलेही जुने दागिने येथे विकले जात नाहीत. ते वितळवून त्यांचे नवे दागिने घडवले जातात. तुम्हाला खड्यांची किंमत सोन्याच्या भावात कधीच द्यावी लागत नाही.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link