Next
‘एमसीई’च्या रात्र महाविद्यालयाचे यश
प्रेस रिलीज
Thursday, December 07 | 06:20 PM
15 0 0
Share this story

पुणे : शहर विभागातर्फे वरिष्ठ गट आंतरमहाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात एमसीई सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाने विजेतेपद मिळवले.

बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये एमसीई रात्र महाविद्यालयाने अंतिम सामन्यात मॉडर्न महाविद्यालयाचा ७-५ होम रनने पराभव केला. विजयी संघाकडून जैद पटेल याने दोन, कर्णधार शुभम काटकर, जैद अन्सारी, आदिल अन्सारी, ओसामा अन्सारी, अब्दुल अहद यांनी प्रत्येकी एक होमरन केल्या. मॉडर्न संघाकडून अक्षय साठे, मयूर गोखले, आकाश कसबे, ऋषिकेश देसाई, ओंकार हुंडारे यांनी प्रत्येकी एक होमरन केल्या.

‘एमसीई’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतीफ मगदूम, आझम स्पोर्ट्स अॅकॅडमीचे गुलझार शेख यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link