Next
पुण्यात महिला उद्योग भवनाचे भूमिपूजन
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 05:09 PM
15 0 0
Share this article:



पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते महिला उद्योग भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. महिलांनी सुरू केलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी एक विशिष्ठ भवन असावे, असे नगरसेविका मंजुषा नागपुरे यांची इच्छा होती. त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून त्या पाठपुरावा करत होत्या. अखेर त्या नियोजित केंद्राच्या कामाला महापौरांच्या हस्ते महिला दिनी सुरुवात झाली.



या प्रसंगी नगरसेवक प्रसन्न जगताप, श्रीकांत जगताप, नगरसेविका ज्योती गोसावी, पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता शीतल वाघ, श्रावणी लवाणे, सौ. बनकर, अंजली जोशी, वृषाली शेलदार, वृषाली जोशी, सुचेता वनारसे यांसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

‘सनसिटी परिसरात ८३९ चौरस मीटरच्या क्षेत्रफळात महिलांसाठीचे हे दुमजली भवन लवकरच उभे राहिल व त्याचा परिसरातील महिलांना विविध उद्योग, कार्यशाळा, ट्रेनिंग आदींसाठी वापर करता येईल,’ असे नागपुरे यांनी या वेळी सांगितले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search