Next
सोया चिली-मिली
BOI
Wednesday, October 11 | 11:00 AM
15 0 0
Share this story

सोया चिली-मिली

मुलांना हल्ली हॉटेलमधील आकर्षक नावं असलेले पदार्थ विशेष आवडतात. तसंच काही तरी आईनं घरी बनवावं असा त्यांचा आग्रह असतो. अशा वेळी मग ब्रोकोली, सोया चंक्स यांसारख्या नवीन घटकांनी युक्त असा पदार्थ केल्यास मुलं खूश होतील.यासाठीच ‘पौष्टिक डब्याची चविष्ट रेसिपी’ या सदरात या वेळी आपण पाहत आहोत एक अनोखा पदार्थ, सोया चिली-मिली...
................... 

ब्रोकोलीहॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर जेवणाआधी स्टार्टर घेण्याची पद्धत जशी रूढ झाली आहे, तशीच ती पद्धत आता घरीही बऱ्याच जणांकडे पाहायला मिळते. मुलांना प्रामुख्याने या स्टार्टरचे विशेष आकर्षण असते. असाच स्टार्टर म्हणून बनवता येईल असा आजचा पदार्थ आहे. सोया चिली-मिली हा पदार्थ जीवनसत्वे, प्रथिने आणि खनिजांनी युक्त आहे. त्यामुळे मुले हा पदार्थ आवडीने तर खातीलाच शिवाय त्यांना यातून पोषणही मिळेल. 

साहित्य : 
सोया चंक्ससोया चंक्स – अर्धी वाटी, फुलकोबी किंवा ब्रोकोली – पाव वाटी, ढोबळी मिरची – एक, बेबी कॉर्न – पाव वाटी
चटणीसाठी साहित्य :
पुदिना – दोन चमचे, कोथिंबीर, मिरची – एक, आलं – मध्यम तुकडा, जिरे – एक चमचा, लिंबू रस – एक चमचा, ओवा – पाव चमचा, मीठ – चवीपुरते, तेल – एक चमचा.  

कृती : 
- सर्वप्रथम सोया चंक्स गरम पाण्यात उकडून घ्या आणि पाणी काढून टाका. 
- घेतलेली फुलकोबी किंवा ब्रोकोली साधारण सोया चंक्सच्या आकाराला साजेश्या अशा तुकड्यात कापून घ्या. 
- बेबीकॉर्न आणि ढोबळी मिरचीचे लांबट तुकडे कापून घ्या. 
- चटणीचे सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- तव्यावर अगदी थोडेसे चमचाभर तेल घेऊन या सगळ्या भाज्या परतून घ्या. 
- भाज्या किंचित मऊ झाल्यावर सोया चंक्स व चटणी घालून ते सगळं एकत्रित करा. त्यात मीठ घालून गॅस बंद करा. (चटणी घातल्यावर गॅस लगेचच बंद करा) 
- तुमची सोया चिली मिली तयार. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link