Next
तनिष्कचा ‘दी ग्रेट डायमंड सेल’ सुरू
प्रेस रिलीज
Tuesday, January 09 | 02:19 PM
15 0 0
Share this story

पुणे : तनिष्क या भारतातील सर्वाधिक विश्वसार्ह ज्वेलरी ब्रँडतर्फे ग्राहकांसाठी ‘द ग्रेट डायमंड सेल’ हा सर्वात मोठा विक्री कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या सेल दरम्यान तनिष्कच्या हिऱ्यांच्या दागिन्यांवर २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.

यादरम्यान तनिष्कच्या सर्व दुकानांत आतापर्यंतचे सर्वात मोठे हिऱ्यांच्या दागिन्यांचे कलेक्शन सादर केले जाणार आहे. सेलची सुरुवात चार जानेवारीपासून झाली असून, तो मर्यादित कालावधीसाठी खुला राहील.

रेड कार्पेट कलेक्शनमधील नेकलेस, मिरायाह कलेक्शनमधील रंगीत खड्यांसह हिऱ्यांचे कानातले आणि अंगठ्या, ग्लिटरटी कलेक्शनमधील आकर्षक पार्टी ज्वेलरी आणि प्रत्येक वधूच्या दागिन्यांच्या संग्रहाला परिपूर्ण जोड देणारे रिवाह डायमंड ब्राइड कलेक्शन हे ग्राहकांच्या निवडीसाठी उपलब्ध आहेत.

या सेलच्या सुरुवातीच्या काही दिवसांत अधिक आकर्षक ऑफर्स देण्यात येणार आहेत. टायटनमध्ये यापूर्वी खरेदी केलेल्या किंवा टायटन इनसर्कल ग्राहकांना पहिले चार दिवस एक टक्का जास्त सवलत मिळणार आहे. शिवाय फक्त मर्यादित कालावधीसाठी ‘एचडीएफसी’ बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सवर अतिरिक्त पाच टक्के ‘कॅशबॅक ऑफर’ही उपलब्ध आहे.

आकर्षक हिरेजडित इअरिंग्ज आणि अंगठ्या २५ हजार रुपयांपासून पुढील किंमतीत उपलब्ध आहेत. याबाबत बोलताना टायटन कंपनी लिमिटेडच्या ज्वेलरी विभागाच्या असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) दीपिका सभरवाल यांनी सांगितले की, ‘हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासोबतच ते वापरण्यातही महिलांची संख्या वाढते आहे, हे पाहून खूप आनंद वाटतो. तनिष्कच्या हिऱ्याच्या दागिन्यांमध्ये एक तेज आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळा वर्ग आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांची आवड असणाऱ्या सर्व महिलांसाठी हा ‘दी ग्रेट डायमंड सेल’ आहे. त्यामध्ये आम्ही आतापर्यंतचे आमचे सर्वोत्कृष्ट डिझाईन्स आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी आकर्षक सवलतीत प्रदर्शित करत आहोत. या सेलमध्ये प्रत्येकासाठी हिऱ्यांचे दागिने आहेत. विशेषतः आपल्या खास व्यक्तीला भेट देण्यासाठी किंवा स्वतः काहीतरी विशेष आहोत याचा अनुभव घेण्यासाठी, अशा प्रत्येक व्यक्तीच्या खास क्षणांमध्ये सहभागी होण्याची तनिष्कची इच्छा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link