Next
‘साईसेवा - एक डिव्हाइन ब्लेसिंग’ पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Wednesday, September 11, 2019 | 02:17 PM
15 0 0
Share this article:



मुंबई :
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी लिहिलेल्या ‘साईसेवा – ए डिव्हाइन ब्लेसिंग’ या पुस्तकाचे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले. 

डॉ. सुरेश हावरे यांनी संस्थानाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर साईभक्तांना केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबविले असून, या उपक्रमांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. एक ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संस्थानाच्या वतीने श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या शताब्दी वर्षात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आदी मान्यवरांनी शताब्दी वर्षात साईंच्या समाधीचे दर्शन घेतले. या मान्यवरांच्या शिर्डीभेटीची माहिती छायाचित्रांसह या पुस्तकात देण्यात आली आहे. 

पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे व माजी मंत्री दीपक सावंत उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search