Next
‘गोदरेज’तर्फे ग्राहकांना जीएसटी कपातीचा लाभ
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 01:02 PM
15 0 0
Share this story

मुंबई : गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ekbØksoso vksoul आणि चेस्ट फ्रीजर्झ या उपकरणांवरील जीएसटी दर नुकताच २८ टक्क्यांवरून कमी होऊन १८ टक्क्यांवर आल्याने गोदरेज अप्लायन्सेस ही भारतातील गृहोपयोगी उपकरणे क्षेत्रातील आघाडीची कंपनी १० टक्के कपातीचा फायदा ग्राहकांना करून देणार आहे. या उपकरणांच्या किंमती कमी केल्या जाणार असून, त्याची अंमलबजावणी तातडीने होणार आहे. यामुळे आगामी फेस्टिव्ह सेल्सना आणखी चालना मिळणार आहे.

नव्या किंमतींना फेस्टिव्ह कन्झ्युमर ऑफर्स, पावसाळा आणि सातव्या वेतन आयोगाची सुधारित आवृत्ती यांची जोड मिळणार असल्यामुळे फेस्टिव्ह सेलमध्ये १२ ते १५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता ‘गोदरेज’कडून वर्तविण्यात येत आहे.

गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड आणि ईव्हीपी कमल नंदी म्हणाले, ‘जीएसटी कौन्सिलने गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ekbØksoso vksoul आणि चेस्ट फ्रीजर्झवरील कर दर १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यामुळे सध्या मंदीच्या परिस्थितीत असलेल्या उपकरण क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे. जीवनशैली बदलत असल्यामुळे घरगुती उपकरणे गरजेच्या वस्तू बनत आहेत. या कपातीमुळे गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ekbØksoso vksoul आणि चेस्ट फ्रीजर्झ आणखी परवडण्याजोगे होणार असून, पर्यायाने या उपकरणांचा वापर वाढेल; तसेच देशभरातील लोकांचे जीवनमान उंचावेल. मागणीत वाढ झाल्यामुळे उत्पादनातही वाढ होईल आणि त्याचा देशाच्या जीडीपीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल.’

‘जीएसटीमध्ये कपात करण्याच्या या बहुप्रतीक्षीत निर्णयाचा लाभ आम्ही ग्राहकांना करून देणार आहोत. गोदरेज रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, ekbØksoso vksoul आणि चेस्ट फ्रीजर्झच्या किंमती १० टक्के जीएसटी कपातीमुळे कमी होणार असून, त्यामुळे आगामी सणासुदींच्या दिवसांत विक्रीला चालना मिळेल व गोदरेज अप्लायन्सेसला गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ठेवलेले २० टक्के वाढीचे उद्दिष्ट पार करता येईल,’ असा विश्वास नंदी यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link