Next
इंडसर्चतर्फे आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा
जीएलएस युनिव्हर्सिटीचा अर्जुन प्रजापती विजेता
BOI
Friday, September 20, 2019 | 05:57 PM
15 0 0
Share this article:

इंडसर्चतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धेतील विजेता   अर्जुन प्रजापती याला डॉ. अशोक जोशी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.

पुणे : इंडसर्चच्या प्रोफेसर प्रमोद पारखी सेंटर फॉर बँकिंग, फायनान्स अँड इन्श्युरन्सतर्फे सातवी आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘बँक मर्जर्स, अ बून टू बँकींग अँड इकॉनॉमी?’ ही या स्पर्धेची संकल्पना होती. ही स्पर्धा इंडसर्चच्या बावधनच्या कॅम्पसमध्ये पार पडली. 

या स्पर्धेचे उद्घाटन कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मिलिंद काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इंडसर्चचे सरसंचालक डॉ. अशोक जोशी, संचालिका डॉ. अपर्णा टेंबुलकर, इंडसर्चच्या डीन डॉ. सुनिता जोशी, कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष अॅड. श्रीपाद पंचपोर, डॉ. विकास पेशवे, प्रा. देवकी जैन आणि प्रा. साहिल शाह आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातून २१ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. एकूण ४१ संशोधन प्रबंधातून २८ संशोधन प्रबंध निवडण्यात आले.

या स्पर्धेत अहमदाबाद येथील जीएलएस युनिव्हर्सिटीचा अर्जुन प्रजापती हा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला. दुसरे पारितोषिक इंडसर्चच्या अनुक्षा ठोंबरे व रिक्षिका पंडित यांना, तर तिसरे पारितोषिक मुंबईच्या नागिनदास खंडवाला कॉलेजच्या कल्पक फाडिया व तन्वी रायचुरा यांना मिळाले. पुण्याच्या सेंट मिराज कॉलेजमधील चांदनी मोहनानी, केट लोपेज व पूजा सिंग आणि इंडसर्चच्या स्वानंद लाटकर, हर्ष गुंजीकर आणि प्रतीक जोशी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

आयसीआयसीआय बँकेच्या क्षेत्रीय प्रमुख कांचन कुलकर्णी, बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक विवेक करंदीकर, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक हेमंत श्रोत्री आणि इंडसर्चचे डॉ. सतीश इनामदार यांनी या स्पर्धेत परीक्षकांची भूमिका बजावली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search