Next
नाशिक रोड रोटरीच्या अध्यक्षपदी डॉ. रोचना शर्मा
BOI
Wednesday, June 26, 2019 | 01:33 PM
15 0 0
Share this article:

नाशिक रोड रोटरी क्लबच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी नूतन अध्यक्षा डा. रोचना शर्मा, उपाध्यक्ष डॉ. अमित गांगुर्डे, सचिव डॉ. स्नेहल गांगुर्डे, माजी अध्यक्ष प्रशांत बिसोई, डॉ. अमित गांगुर्डे, बाळकृष्ण साहू, उपप्रांतपाल क्षत्रिय कैलास, दादा देशमुख, रमेश मेहेर

नाशिक : रोटरी क्लब नाशिक रोडचा पदग्रहण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. रोचना शर्मा, उपाध्यक्षपदी डॉ. अमित गांगुर्डे, सचिवपदी डॉ. स्नेहल गांगुर्डे यांनी शपथ घेतली.  

या वेळी क्लबचे मावळते अध्यक्ष प्रशांत बिसोई, डॉ. अमित गांगुर्डे, बाळकृष्ण साहू, उपप्रांतपाल क्षत्रिय कैलास, दादा देशमुख, रमेश मेहेर, अॅड. दिनेश शिंदे, कुणाल वर्मा, धनंजय जोशी, ग्यानेंद्र गुप्ता, व्हिनस वाणी, महेश साळवे, विभा पाटील, अशोक कार, प्रणव चौधरी, अनिल काळे, रोहित उपरित, टी. सी. लिंगय्या, अश्विनी निरगुडे, विक्रांत किवंदे, ओमप्रकाश श्रीवास्तव, रवी श्रीवास्तव, सौमिनत्री दास, शुभांगी काळे, अरविंद दुबे, सुभाष थोरात, नाना शेवाळे, गुरुमित सिंग, दीपक चौधरी आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना प्रांतपाल शब्बीर शाकीर यांनी दुसऱ्यांची सेवा करून त्यांचे दुःख दूर करण्याचे, तसेच देणगीदारांचा विश्वास सार्थ ठरवण्याचे आवाहन केले. या वेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी गरजवंतांसाठी काम करण्याची शपथ घेतली. वृद्धाश्रमात वृद्धांसाठी मनोजनं केंद्रे, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, ज्या गावात पाण्याची समस्या असेल अशा गावांमध्ये पाण्याच्या टाक्या, महिला आणि मुलींसाठी सॅनेटरी नॅपकिन वेंडिंग मशीन अशी सार्वजनिक हिताची कामे येत्या वर्षभरात केली जातील, असे यावेळी नवनियुक्त अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

ग्यानेश वर्मा, वर्षा जोशी यांनी स्वागत केले. अमित गांगुर्डे यांनी वार्षिक अहवाल सादर केला. फिरदोस कपाडिया, हेमंत शिधये, सुनिता वर्मा यांनी सूत्रसंचलन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search