Next
किल्ल्यांच्या जपणुकीसाठी दुर्गपूजेचे आयोजन
BOI
Monday, February 25, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने ‘शिवाजी ट्रेल’ व ‘दुर्गसंवर्धन’ या संस्थांच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून दुर्गपूजा केली जाते. पुण्यात सिंहगड येथील शिवकालीन चौडाई देवी मंदिरात देवीची आरती करून दुर्गपूजा करण्यात आली.

सरदार अभयराजे शिरोळे, सरदार जोरावर माने, सरदार राजराजेंद्र शिवराज राजे यांच्या हस्ते सिंहगडावरील शिवकालीन चौडाई देवीची आरती करून ही पूजा करण्यात आली. दुर्गसंवर्धन आणि शिवाजी ट्रेल या संस्थांच्या वतीने देशभरातील १३१ किल्ल्यांची दुर्गपूजा करण्यात आली असून यानंतरदेखील ही परंपरा सुरू ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, तसेच गडावरील निसर्गसंपदा जपली जावी आणि पुढील पिढ्यांना या किल्ल्यांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने दुर्गपूजेचे आयोजन केले जात असल्याचे संस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search