Next
‘होंडा’ची नवी ‘एक्स-ब्लेड’ दाखल
प्रेस रिलीज
Saturday, March 17, 2018 | 11:33 AM
15 0 0
Share this story

गुरुग्राम (हरियाणा) : ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.’ने नव्या १६० सीसी स्पोर्टी मोटरसायकल ‘एक्स-ब्लेड’ची किंमत जाहीर केली. ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदाच प्रदर्शित करण्यात आलेल्या स्टायलिश ‘एक्स-ब्लेड’ची किंमत ७८ हजार ५०० रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

‘एक्स-ब्लेड’विषयी सांगताना ‘होंडा’चे सेल्स व मार्केटिंग उपाध्यक्ष यादविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘आक्रमक व भविष्यात्मक नवी ‘एक्स-ब्लेड’ विशेषतः तरुण पिढीसाठी तयार करण्यात आली आहे. आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे, ‘एक्स-ब्लेड’ डिस्पॅच करण्यास आम्ही मार्च २०१८मध्ये सुरुवात केली आहे. आकर्षक स्टाइल, ‘होंडा’चे लोकप्रिय एचईटी १६० सीसी इंजिन व दर्जेदार तंत्रज्ञान ही वैशिष्ट्ये असलेल्या ‘एक्स-ब्लेड’ने नवा मैलाचा टप्पा निर्माण केला आहे आणि तोही ७८ हजार ५०० (एक्स-शोरूम दिल्ली) इतक्या रास्त दरामध्ये.’

‘एक्स-ब्लेड’चे डिझाइन अत्यंत आकर्षक आहे. या श्रेणीत प्रथमच वापरलेले भविष्यात्मक एलईडी हेडलँम्स एखाद्या रोबोप्रमाणे भासतात. सर्रास वापरल्या जाणाऱ्या हॅलोजन लँपच्या तुलनेत ‘एक्स-ब्लेड’चा प्रकाश अधिक प्रखर आहे. नऊ एलईडी पोझिशन लँपमुळे ‘एक्स-ब्लेड’ सर्वांमधून उठून दिसते. रेझर एज्ड एलईडी टेललँप व इंधनाची टाकी यामुळे ‘एक्स-ब्लेड’चे रूप अधिक खुलते. ग्रॅब रेलचे डिझाइन मोटरसायकलच्या मागील भागाची आक्रमकता वाढवते, तर रिअर टायर हगर फेंडर चिखल साचू देत नाहीत. ड्युएल आउटलेट मफलर व क्रोम टिप यांचा वापर केल्यामुळे ही मोटरसायकल स्पोर्टी दिसते.

‘एक्स-ब्लेड’ला ‘होंडा’च्या विश्वासार्ह १६२.७१ सीसी एचईटी इंजिनाचे बळ दिले असून, ते कामगिरी व कार्यक्षमता यांचे संतुलन साधण्यासाठी आदर्श आहे. आठ हजार ५०० ‘आरपीएम’ने १३.९३ बीएचपी निर्मिती करणे व सहा हजार ‘आरपीएम’ने १३.९ एनएमची निर्मिती करणे, यामुळेही जलद अक्सिलरेशन होते व भार वाहण्याची क्षमता अधिक राहते. कमी व मध्यम पल्ल्याची कामगिरी करण्याच्या दृष्टीने इंजिनाची रचना करण्यात आली आहे.

स्पोर्टी वैशिष्ट्ये व उपयुक्तता यांचे संतुलन साधण्यासाठी ‘एक्स-ब्लेड’मध्ये अचूक व अलगद शिफ्टसाठी लिंक टाइप गिअर शिफ्टर बसवला आहे. १३० मिमी रूंद टायर व मोनो शॉक रिअर सस्पेन्शन यामुळे कॉर्नरिंगच्या वेळी योग्य प्रकारे मोटरसायकल हाताळता येते. अष्टपैलू असलेल्या स्टायलिश ‘एक्स-ब्लेड’ने लांब सीट, सील चेन व हझार्ड स्विच यांचा समावेश करून आरामदायीपणा व सुरक्षा यावरही भर दिला आहे. स्ट्रीट टेक डिजिटल मीटरमुळे सर्व्हिस ड्युएल इंडिकेटर, डिजिटल क्लॉक व गिअर पोझिशन इंडिकेटरच्या मदतीने अधिकाधिक सोय मिळते.

देशातील सर्व होंडा डीलर्समध्ये पाच हजार रुपये भरून ‘एक्स-ब्लेड’चे बुकिंग करता येऊ शकते. मॅट मार्वल ब्लू मेटॅलिक, मॅट फ्रोझन सिल्व्हर मेटॅलिक, पर्ल स्पार्टन रेड, पर्ल इग्नेस ब्लॅक व मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक या पाच स्पोर्टी रंगांमध्ये ‘एक्स-ब्लेड’ उपलब्ध आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link