Next
‘जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट’तर्फे वैद्यकीय शिबिर
BOI
Saturday, January 19, 2019 | 12:18 PM
15 0 0
Share this article:जयगड : रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट, रत्नागिरी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, जयगड ग्रुप ग्रामपंचायत व डेरवण (ता. चिपळूण) येथील  वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जयगड स्टेशन एमएमबी ऑफिसच्या प्रांगणात दोन दिवसीय भव्य वैद्यकीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा लाभ ३०० हून अधिक ग्रामस्थांनी घेतला.

शिबिराचे उद्घाटन धन्वंतरीच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे रामडॉस वेट्रीवल, संदीप दायमा, शिवप्रसाद गोरे, नवनीत शुक्ला, सुधीर तैलंग, जयगड ग्रामपंचायतीच्या फरजाना डांगे, साखरमोहल्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच हुरबानो गुहागरकर, उपसरपंच मुश्ताक टेमकर, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे श्री. मुल्ला व श्री. तांबे व वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञांचा समूह व त्यांच्या प्रमुख आसावरी मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.या दोन दिवसीय शिबिरामध्ये वालावलकर रुग्णालयाच्या अस्थिरोग तज्ज्ञ, हृदयरोग तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ, कान नाक घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, दंततज्ज्ञ, शस्त्रकिया विशेषज्ञ व सामान्य चिकित्सक यांच्या समुहाने ३०० हून अधिक ग्रामस्थांची मोफत तपासणी केली. १०० हून अधिक ग्रामस्थांची रक्तदाब, हिमोग्लोबिन व मधुमेह तपासणी करण्यात आली, तर २० रुग्णांचा इसीजी करण्यात आला.

स्त्रीरोग विशेषज्ञ श्री वावेकर यांनी तपासणीसाठी आलेल्या सर्व स्त्रियांना स्तनाचा कर्करोग कसा ओळखावा व स्वतःची तपासणी स्वतः कशी करावी या विषयी माहिती दिली. या शिवाय पॅप स्मिअरची तपासणी का करावी, केव्हा करावी याचेसुद्धा महत्त्व पटवून सांगितले. १९ महिलांनी ही तपासणी करवून घेतली. मच्छिमार बांधवांनी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.वालावलकर रुग्णालयाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्यातही हे दोन दिवसीय वैद्यकीय शिबिर पुन्हा आयोजित केले जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

या शिबिरासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे सुनील पाटील व  जयगड ग्रामपंचायतीचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे समीर गायकवाड, सुनील खडका, करुणामूर्ती अरविंद चतुर्वेदी, अतुल केळकर यांची उपस्थिती लाभली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे युनिट हेड श्रीराम रवी चंदेर, सीएसआर विभागाचे प्रमुख सुधीर तैलंग यांचे मार्गदर्शन लाभले. सनोबर सांगरे, दर्शना रहाटे, योगिता महाकाळ, सर्इ मंगेश साळवी यांनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search