Next
मदतीच्या भावनेतून देशाची संस्कृती दिसते : सुभाष घई
‘पुणे रोड रनर्स’च्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन
BOI
Monday, September 10 | 06:30 PM
15 0 0
Share this story


पुणे : केरळमधील पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी देशभरातून विविध स्वरूपात मदत केली जात आहे. महाराष्ट्रातूनही विविध संस्थांनी मदतीचा हात पूढे केला आहे. पुण्यातील ‘पुणे रोड रनर्स’ या संस्थेच्या हौशी कार्यकर्त्यांनी केरळच्या मदतीसाठी ‘पुणे मॅरेथॉन’चे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच ‘प्रोमो रन’चे आयोजन करण्यात आले होते. याला बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांची विशेष उपस्थिती होती. 

केरळमधील पूरपरिस्थिती निवळली असली, तरी तिथे अनेकांची घरे वाहून गेली आहेत, अनेक लोक बेपत्ता आहेत, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. ही परिस्थिती पाहून संपूर्ण देशाने केरळ सरकारला मदतीचा हात दिला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील हौशी रोड रनर्स एकत्र आले आहेत. त्यांनी केरळच्या मदतीसाठी येत्या सात ऑक्टोबरला सहा किलोमीटरची फॅमिली रन, २१ किलोमीटर, १० किलोमीटर या प्रकारांत मॅरेथॉन आयोजित केली असून त्याची प्रोमो रन भांबुर्डा येथील जैन मंदिर परिसरात पार पडली. 

दिग्दर्शक सुभाष घईयामध्ये हौशी रोड रनर्स व त्यांचे नातेवाईकही सहभागी झाले होते. यावेळी दिग्दर्शक सुभाष घई यांनी सहभाग घेतला. ‘एक राज्य दुसऱ्या राज्याला मदत करत आहे. अशा उपक्रमांतून देशाची संस्कृती, एकमेकांप्रतीची भावना यांचे दर्शन होत असल्याने, याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे’, अशा भावना सुभाष घई यांनी व्यक्त केल्या. सात ऑक्टोबरला पुण्यात होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी घई यांनी केले. 

(सुभाष घई यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link