Next
‘टाटा पॉवर’तर्फे ‘हम्पबॅक महसीर’ मोहीम सुरू
BOI
Friday, July 13, 2018 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : टाटा पॉवर कंपनीतर्फे गोड्या पाण्यातील माशांचे संवर्धन करण्याची मोहीम गेली चार दशके चालवली जात आहे. या मोहिमेत आता ‘हम्पबॅक महसीर’ या माशाला वाचविण्याच्या प्रयत्नांचीही भर पडली आहे. या माशाला ‘तोर रेमादेवी’ असे शास्त्रीय नाव देऊन त्याची नोंद’ इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर’ (आययूसूएन) या संस्थेच्या नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींची नोंद या यादीत समाविष्ट करण्याचा ‘टाटा पॉवर’चा हेतू आहे.

महसीर या जातीच्या माशातील हम्पबॅक ही एक महत्त्वाची प्रजाती आहे. हा मासा जगात केवळ कावेरी नदीच्या पाण्यातच आढळतो. या माशाबद्दल अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. त्याला शास्त्रीय नाव दिल्याने ‘आययूसीएन’कडील नामशेष होणाऱ्या प्रजातींमध्ये त्याचा समावेश होऊ शकेल. त्यामुळे जागतिक स्तरावर या माशाच्या संवर्धनासाठी विचार होऊ शकेल.

उर्जा क्षेत्रात देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ‘टाटा पॉवर’चे कार्यकारी संचालक व मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक सेठी या मोहिमेबाबत म्हणाले, ‘जीवनाचा मार्ग हा शाश्वत मूल्यांवर आधारलेला असावा, या तत्त्वावर टाटा पॉवर कंपनीचा विश्वास आहे. त्या दृष्टीकोनातून कावेरी नदीतील जलचरांच्या संवर्धनाचे आमचे प्रयत्न गेल्या चार दशकांपासून सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून हम्पबॅक महसीर माशाला वाचवण्यासाठी आम्ही जनजागृती करीत आहोत. या माशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकणारी परिस्थिती आम्ही बदलवू पाहात आहोत. जनजागृतीसाठी मुलांपर्यत पोहोचण्यासाठी शाळांमध्ये जाण्याचा कार्यक्रम आम्ही आखला आहे.’

टाटा पॉवर कंपनीने पश्चिम घाटातील उत्तरेकडील भागात महसीर माशाच्या प्रजननासाठी विशेष केंद्र उभारले आहे. कावेरी मोहिमेतील महसीर ट्रस्ट आणि टाटा पॉवर यांनी संयुक्तरित्या सर्वेश्क्षणाची मोहिमही हाती घेतली आहे. कावेरी नदीच्या उपनद्यांमध्ये ‘हम्पबॅक महसीर’चा शोध घेतला जात आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search